Sanjay Raut Statement on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल (बुधवारी) दिल्लीत एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे त्या पुन्हा पक्षावर नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंडेंना सल्ला दिला आहे.
"मी भाजपची आहे, मात्र भाजप पक्ष माझा नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले.त्यावर संजय राऊतांनी त्यांना सल्ला देत "परिणामांची पर्वा न करता आता पंकजा मुंडे यांनी आता धाडसाने निर्णय घ्यावा," असे सूचक आवाहन केले आहे. "माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही," असा टोमणा राऊतांनी मुंडेंना हाणला आहे.
बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. (Political Breaking News)
आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी मुंडेंना सल्ला देत त्यांची खिल्ली उठवली, ते म्हणाले, "पंकजा मुंडे यांना भाजपात कोणी मानत नाही. त्यामुळेच त्यांनी असे विधान केलं असावं. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्षासाठी रक्ताचे पाणी केले. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शुन्यातून भाजप निर्माण केला. मात्र, आज मुंडे परिवाराचे अस्तित्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली व महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत,"
"पंकजा मुंडेंनी आता साहसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परिणामांची पर्वा न करता पंकजा मुंडे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा, आमच्यावर अन्याय होतो, अशा सततच्या रडगाण्यांना कोणी विचारत नाही," असा टोला त्यांनी लगावला. (Political Short Videos)
"गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील," असे राऊत म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.