BJP Shirur Taluka Presidents: शिरुर भाजपचे दोन तालुकाध्यक्ष कोण ?; इच्छुकांच्या आज..

BJP Shirur taluka : शिरुरच्या ३९ गावांसाठी (शिरुर बेट मंडल) तालुकाध्यक्ष निवडला जाणार आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP Shirur Taluka: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिरुरमध्ये सपाटून मार खालेल्या भाजपने आता दोन तालुकाध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.

शिरुर तालुक्यासाठी हे दोन अध्यक्ष कोण असणार, लवकरच समजणार आहे, आज त्यासाठी मुलाखती आहेत. लोणीकंद (ता.हवेली) येथे पक्ष प्रभारी राजेश पांडे हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील शिरुरच्या ३९ गावांसाठी (शिरुर बेट मंडल) तालुकाध्यक्ष निवडला जाणार आहे.

BJP
Prakash Ambedkar News: "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

हे आहेत इच्छुक

विद्यमान तलुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे सुपुत्र, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, तालुका सरचिटणीस माऊली बहिरट, माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, राजेंद्र ढमढरे, हे शिरुर मंडलासाठी इच्छुक आहेत.

अनिल नवले, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सवित्रा थोरात, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, विशाल खरपुडे, सतीश पाचंगे हे शिरुर-बेट मंडलसाठी (३९)गावे प्रमुख इच्छुक आहे.

BJP
Karnataka Hijab Row: 'हिजाब' वरील बंदी उठणार? ; शिक्षणमंत्र्यांच्या विधानामुळे कर्नाटकात..

या इच्छुकांमध्ये असलेले संघटना करण्याची क्षमता, सोशल मीडियाबाबत उत्तम माहिती, सर्व समाजघटकांना एकत्र ठेवण्याचे कसब, पक्ष कार्यक्रम, भाजपने सरकार म्हणून केलेली कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न असलेल्या पदाधिकाऱ्यांची तालुकाध्यक्षपदी निवड होऊ शकते.

दुसरीकडे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने पक्षाने तेथे नव्या उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. त्यातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व मर्जीतील असे राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com