जावई मंत्री होतील, असं वाटलं, पण ते अध्यक्ष झाले ; जयंत पाटलांचा टोला

सदस्यांनीही सभागृहाचा मान राखून नियमांनुसारच वर्तन करावे. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे.
Rahul Narvekar, Jayant Patil
Rahul Narvekar, Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "सुशिक्षित, कायद्य़ाचे ज्ञान असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष (assembly speaker election) झाले आहेत. याचा लाभ सभागृहाचे कामकाज करताना नार्वेकरांना होईल. त्यांच्याकडून सर्वांना न्याय मिळेल,” अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केली. (Jayant Patil news update)

“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्याप्रमाणे आमचेही जावई आहेत. आमचे जावई मंत्री होतील, असे वाटत होते; परंतु त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. याचा आम्हाला आनंद आहे," असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले "सभागृहाचे कामकाज करताना नियमांचे पालन व्हावे, याबाबत त्यांनी लक्ष देऊन सूचना द्याव्यात. या सूचना सर्व सदस्यांनी पाळाव्यात. सदस्यांनीही सभागृहाचा मान राखून नियमांनुसारच वर्तन करावे. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे,"

Rahul Narvekar, Jayant Patil
शिंदे सरकारला सळो की पळो करणारा नेता शरद पवार ठरविणार !

राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास हा शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप असा आहे. यावर भाष्य करताना नार्वेकरांनी नेतृत्व कौशल्याविषयी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कौतुक केलं. ते म्हणाले, "नार्वेकर शिवसेनेत असताना आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते, तेव्हापासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. ते राष्ट्रवादीत असताना ते माझ्या जवळचे सहकारी होते, आता ते भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. ते ज्या ज्या पक्षात होते, तेथे ते पक्षनेतृत्वाच्या अगदी जवळ होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना लवकर आपल्या जवळचे करुन घ्यावे, नाहीतर त्यांचं काही खरं नाही,"

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली. राहुल नार्वेकर यांना 164 तर मविआचे राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मतं मिळाली. तर समाजवादी पक्ष (SP) आणि एमआयएम (AIMIM) आमदार तटस्थ राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com