Raj Thackery Vs Uddhav Thackeray: कल्याणमध्ये मनसेला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Politics News: ऑऊटगोईंग - इनकमिंगचे सत्र सुरुच
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : ठाकरे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण-डोंबिवली परिसरातील शहरसंघटक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख व अनेक पदाधिकाऱ्यांनी आज 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Pune NCP : राष्ट्रवादीच्या विरोधात जाणं भोवलं; विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी

राज्यातील सत्ता संघर्षानंतर वेगवेगळ्या पक्षामध्ये इनकमिंग ऑऊटगोईंग चे सत्र सुरूच आहे. गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील जवळीक वाढतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवली परिसरातील हरसंघटक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख व अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

येत्या ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेची मनसेकडून जोरदार तयारी सुरू असतानाच, या पक्ष प्रवेशाने रत्नागिरी सभेआधी राज ठाकरेंना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
kolhapur News : विजयाचा गुलाल उधळताच महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; राजकारणाला वेगळी दिशा मिळणार...

ऑऊटगोईंग - इनकमिंगचे सत्र सुरुच

दरम्यान, एकीकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असतानाच दुसरीकडे कल्याणमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (शिवसेनेत) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Edited by: Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com