महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज फैसला होणार?

Maharashtra Political Crises| पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दिवाळी आणि इतर सुट्ट्यांमुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. या संघर्षावर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आजची सुनावणी होत आहे.घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद केला जाणार आहे.

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
एक लाख 80 हजार कोटींच्या बदल्यात मोदींकडून महाराष्ट्राला 500 कोटींचा प्रकल्प

तसेच, निवडणूक आयोगाने गोठवलेले धनुष्यबाणाचे चिन्हाबाबत ही आज युक्तिवाद होऊ शकतो. 27 सप्टेंबरला मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, निवडणुकांचे प्रकरण न आल्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि सुनील प्रभू यांनी आव्हान दिले होते. तसेच सुनील प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीलाही विरोध केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी त्यांनी याचिकेतून केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरुन आव्हान दिले आहे. या वेगवेगळ्या प्रकरणांवरील पाच-सहा याचिकांवर आज घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये कुणाचा समावेश आहे?

1. न्या. धनंजय चंद्रचूड

2. न्या.एम आर शहा

3. न्या. कृष्ण मुरारी

4. न्या.हिमाकोहली

5. न्या. पी नरसिंहा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com