महाराष्ट्र सदन कितना सुंदर.. पर बनानेवाला अंदर : भुजबळांनी खंत बोलवून दाखवली!

Chhagan Bhujbhal : पाच हजार वर्षे आम्हाला का शिकू दिले नाही. मात्र अशा वेळी महात्मा फुले आणि सावित्री फुले या पुढे आल्या.
Chhagan Bhujabal
Chhagan BhujabalSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार सोहळ्याचे कार्यक्रम पार पडले. भुजबळ यांचा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पवार (sharad pawar) यांनी छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांचे कौतुक केले. विविध नेत्यांनी यावेळी भुजबळांप्रती आपलया भावना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी भुजबळ यांनी भाषण केले.

यावेळी भुजबळांनी आठवणींनी उजाळा दिला. ते म्हणाले, माझ्यावर अनेक आरोप झाले, एक काम तर शंभर कोटीचं होतं पण आरोप करणारे म्हणाले हजार कोटी खाल्ले. दिल्लीतले लोक म्हणायचे की, महाराष्ट्र सदन कितना सुंदर है पर बनानेवाला अंदर है, यावेळी एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, अडीच वर्षे जेलमध्ये जाऊन आलेल्या माणसाला, सरकार बनल्यानंतर पवार साहेबांनी मंत्रीपदाची शपथ दिली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

Chhagan Bhujabal
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते...

बाळासाहेब ठाकरेंनीही मला झोपडपट्टीतून महापौर पदापर्यंत आणलं. बाळासाहेब ठाकरें काँग्रेससोबत गेले नाही असे नाही, त्यांनी मुस्लिम लीग सोबतही सभा घेतल्या. राजकारणात पुढे जायचं असेल काही वेळा तडजोडी कराव्या लागतात. सत्यशोधक समाजात काय लिहलंय ते वाचा. स्वरस्वती ही विद्येची देवता आहे, सांगितलं जातं. मग पाच हजार वर्षे आम्हाला का शिकू दिले नाही. मात्र अशा वेळी महात्मा फुले आणि सावित्री फुले या पुढे आल्या. पहिली शाळा निघाली तेव्हा काही ब्राह्मणांनी पाठींबी दिला. पहिल्या वर्गात सहा मुली होत्या, त्यात चार ब्राह्मण मुली होत्या. फुल्यांनी आपल्याला शिकवलं, असेही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujabal
Chhagan Bhujbal : 'महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना पवारांची क्लिनचीट'

छगन भुजबळ यांच्या या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशातील आणि राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, जेष्ट लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, यांच्यासह देशभरातील अनेक नेतेमंडळी तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com