Lok Sabha Election 2024 : मुंबईत होणार महायुतीचा महामेळावा, जय्यत तयारी सुरू; टार्गेटही ठरलं!

Mahayuti Melava In Mumbai For Upcoming Elections : आगामी निवडणुकांसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे...
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव-

Maharashtra Politics Latest News : आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारने जय्यत तयारीला सुरू केली आहे. महायुतीकडून येत्या 14 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात महामेळावे घेतले जाणार आहेत. मात्र त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये एक भव्य महामेळावा आयोजित केला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महायुती कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरणार आहेत. आणि यासाठी या महामेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जानेवारी महिन्यात राज्यात 14 जानेवारीला ठिकठिकाणी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय मेळावे आयोजित करणार आले आहेत. हे सगळे मेळावे घेतल्यानंतर शेवटी फेब्रुवारीच्या अखेरीस Mumbai मध्ये महायुतीची मेळावा होणार आहे.

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Thackeray Vs Shinde : मेट्रोवरून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात रंगणार 'सामना'

महायुतीच्या मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान किंवा वांद्रे बीकेसीमधील मैदानावर या महामेळाव्याचे नियोजन करणे सुरू आहे. सर्व जिल्हास्तरीय मेळावे झाल्यावार या सगळ्याचा शेवट मुंबईत होणार आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे. 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर मेळावे होणार आहेत. मोदींजींच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला एक मोठे यश मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा लांबणीवर?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी तर्फे वज्रमूठ सभेचे आयोजन केले गेले होते. मात्र केवळ 3 सभा झाल्यावर या या सभांना फुलस्टॉप लागला. जी प्राथमिक माहिती मिळत आहे, त्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपानंतर या सभा पुन्हा एकदा सुरू होतील अशी चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुती तर्फे अनेक मेळावे आणि सभा आयोजित केले जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईवर लक्ष केंद्रीत

लोकसभा निवडणूक जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच महत्त्वाची मुंबई महापालिका निवडणूकही आहे. मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. आता भाजपला मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी भाजपने कंबर देखील कसली आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून येतील आणि आपलाच महापौर विराजमान होईल, असा दावा भाजपने केला आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहे. तरीही महापौर आमचाच होणार, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मुंबईत मेळावे, घराघरात जागृती केली जात आहे. मुंबईत नेमकी किती विकास कामे झाली आणि किती फोल ठरली याचा आढावा आणि माहिती जनतेला दिली जात आहे. त्यामुळे निश्चित मुंबईवर देखील आता सगळ्यांचा फोकस हा मुंबईवर असणार आहे.

edited by sachin fulpagare

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sewri Nhava Sheva Sea Link : 12 जानेवारीपासून मुंबई-उरण प्रवास सुसाट; 20 मिनिटांत थेट रायगड जिल्ह्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com