
पंकड रोडेकर
Thane News : राजकीय नेत्यांकडून भाषण देताना अनेकदा बोलण्याच्या नादात वादग्रस्त विधानं केली जातात, तर कधी नेत्यांची पदं चुकवली जातात. नेत्यांनाही लाजवेल असं गुणगान गायलं जातं. असंच काहीसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे नेते नरेश म्हस्के यांचं झालं. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला, तर फडणवीस, शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब्रह्मा-विष्णू-महेश असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मेळाव्यामध्ये भाषणादरम्यान बोलताना म्हस्के (Naresh Mhaske) हे या तिघांचे कौतुक करताना थकले नाहीत. ते म्हणाले, राजकारणात दिलेल्या शब्दाची किंमत राहिलेली नाही. मात्र, आपले तिन्ही नेते शब्दासाठी जागणारे आणि जगणारे आहेत. यातील पहिले नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव येते, असे म्हस्के म्हणाले. म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) दुसरे आणि तिसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तिघे ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत, असे म्हस्के यांनी सांगितले. तिघे मोदींचे हात बळकट आणि सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत आहेत. फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व्यासपीठावर नव्हते. खासदार शिंदे हे म्हस्के यांचे भाषण संपताना आले. याचदरम्यान म्हस्के यांनी फडणवीस-अजित दादा-एकनाथ शिंदे यांचे गुणगान करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
महायुती मेळावा रविवारी ठाण्यात पार पडला. यावेळी शिंदे गटाकडून प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जोरदार भाषण केले. गेल्या 35 वर्षांत सलग पाच वर्षे कोणालाही मुख्यमंत्री म्हणून राहता आलेले नाही. ते फडणवीसांनी करून दाखवलं. केवळ फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले, हा महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे.
शिंदेंच्या शब्दासाठी सोडली महापालिका
फडणवीस हे एकवचनी असून संख्याबळ असताना देशाची आर्थिक राजधानी असलेली महापालिकेची सत्ता त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडली ते एकनाथ शिंदे यांच्या एका शब्दासाठी, असे म्हणत म्हस्के यांनी ती सोडायला वाघाचे काळीज लागते आणि शब्द टाकायला वाघच असावा लागतो, असेही म्हटले.
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.