Cabinet On Maratha Reservation : मराठा आंदोलक अन् शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Onion Producer and Maratha Protest : पहिल्या दिवशी कांदा उत्पादकांना ३०० कोटींचे अनुदान
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama

Mumbai Political News : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला 'अल्टिमेटम' दिल्यानंतर जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात मराठवाड्यातील मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Political News)

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरक्षणाचा 'जीआर' निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही. तसेच शिष्टमंडळाला आणखी चार दिवसांची मुदत देऊन जरांगेंनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय मंगळवारी स्पष्ट केला. यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाचा 'इम्पॅक्ट'! सरकार आरक्षणासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत ?

या बैठकीत मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समितीचा अहवाल सात दिवासांत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हा अहवाल येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र बैठकीत सात दिवसांतच हा अहवाल देण्याचे आदेश महसूल सचिवांना देण्यात आले आहे. यामुळे सात दिवसानंतर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येणाऱ्या अहवालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Sonia Gandhi Letter To PM : सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र ; विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याने दरावर परिणाम झाला. यामुळे आडचणीत भर पडल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यासाठीचे सानुग्रह अनुदान ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पहिल्याच दिवशी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com