Bulli Bai App : मास्टरमाईंडबाबत धक्कादायक खुलासा...असा झाला पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात मास्टरमाईंड जाळ्यात अडकला आहे.
Bulli Bai App

Bulli Bai App

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : सोशल मीडियात विविध मुद्यांवर विचार मांडणाऱ्या 100 प्रसिध्द मुस्लिम महिलांची Bulli Bai अॅपवरून बदनामी करण्याच्या षडयंत्राचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. या षडयंत्राचा मास्टरमाईंड एक महिलाच असल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेला पोलिसांनी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी बेंगलुरू येथून तिच्या मित्राला अटक केली आहे.

Bulli Bai अॅप वर शंभर मुस्लिम महिलांचे फोटो टाकून त्यांची बदनामी केली जात होती. तसेच त्यांचा लिलावही करण्यात येत होता. या महिन्यांविषयी अत्यंत अभद्र टिपण्णी केली जात असल्याने शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांत्यासह अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केली होती. अखेर मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

<div class="paragraphs"><p>Bulli Bai App</p></div>
अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी; एका दिवसातील रुग्णसंख्येनं मोडला जागतिक विक्रम

पोलिसांनी सोमवारी बेगंलुरू येथून विशाल कुमार झा (Vishal kumar Jha) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरूणाला अटक केली होती. त्याच्याकडे अनेक तास चौकशी केल्यानंतर मास्टमाईंड असलेल्या महिलेची माहिती समोर आली. दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झाली होती. विशाल कुमारकडून महिलेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम उत्तराखंडमध्ये दाखल झाली होती. तिथेच तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

<div class="paragraphs"><p>Bulli Bai App</p></div>
कोरोनाची तिसरी लाट, मुख्यमंत्रीही पॉझिटिव्ह तरी सरकारचा धक्कादायक निर्णय

दोघेजण फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियात एकमेकांचे मित्र असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणे सोपे गेले. या धक्कादायक प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेली महिला Bulli Bai App शी संबंधित तीन खाती चालवत होती. तर विशाल कुमारचे खालसा सुप्रिमिस्टच्या नावाने खाते होते. या षडयंत्रमागे शीख व्यक्ती असल्याचा गैरसमज पसरवण्यासाठी हे नाव दिल्याचे समोर आले आहे. विशाल कुमार याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bulli Bai शी संबंधित सर्व माहिती ट्विटरवरून काढून टाकण्याचे आदेश दिल्ली पोलिसांनीही दिली आहे. तसेच पोलिसांनी ट्विटरकडे Bulli Bai शी संबंधित पहिले ट्विट केलेल्या व्यक्तीचा माहिती मागितली आहे. दिल्ली पोलिसांनी गिटहब (GITHUB) वरून Bulli Bai अॅप बनवणाऱ्या व्यक्तीचीही माहिती मागवली आहे. काही दिवसांपूर्वी Sulli Deals हे अॅपही बनवण्यात आले होते. त्यानंतर दुसरे अॅप आल्याने खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com