Maratha Reservation : आरक्षणावर बोललो तर बोंबाबोंब होईल; नाना पाटेकरांचे मोठे विधान

Nana Patekar On Maratha Reservation In Maharashtra : मराठा आरक्षणावर प्रश्न विचारल्यावर नाना पाटेकर काय म्हणाले?
Nana Patekar
Nana PatekarSarkarnama
Published on
Updated on

Nana Patekar Politics :

मराठा आरक्षणावरून राज्यात मोठे आंदोलन सुरू आहे. आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी आसा वादही सुरू आहे. जाळपोळीच्या घटनाही घडल्या. तसेच धनगर आरक्षणाचाही मुद्दा तापलेला आहे. एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आरक्षणावरून वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत अभिनेते Nana Patekar यांनी आरक्षणावर मोठे वक्तव्य केले आहे.

Nana Patekar
Mla Disqualification Case Verdict : ठाकरे गटाला आता शेवटची आशा; सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार

काय म्हणाले नाना पाटेकर?

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे आक्रमक आहेत. राज्यभर आंदोलन केल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. अशातच अभिनेते नाना पाटेकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत पराकोटीचे आहे, असे नाना पाटेकर म्हणाले आहेत.

आरक्षणाबाबत माझी मतं ही फार पराकोटीची आहेत. त्यावर मी काही बोललो तर बोबाबोंब होईल. त्यामुळे आरक्षणावर टिप्पणी न केलेलीच बरी, असे नाना पाटेकर म्हणाले. राजकारणात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'भाजपचे काम चांगले'

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर मोठे विधान केले होते. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजप प्रचंड बहुमताने जिंकून येतील, असे नाना पाटेकर म्हणाले होते. नाना पाटेकर यांनी पुन्हा भाजपबद्दल वक्तव्य केले आहे. राजकारणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. मी शिवसेनेचा कट्टर समर्थक होतो. पण आता भाजप चांगले काम करेल, अशी खात्री वाटते. नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीसांचे काम मला आवडले, असे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.

edited by sachin fulpagare

Nana Patekar
Rahul Narwekar : 'ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप लागू असणार' ; राहुल नार्वेकरांनी केलं स्पष्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com