Maratha Reservation News : 'रास्ता रोको' पूर्वीच ठाण्यात मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Thane Maratha Agitation News : बारावीची परीक्षा लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात केली घोषणबाजी आणि परीपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी.
Thane Maratha Agitation
Thane Maratha AgitationMaratha Reservation
Published on
Updated on

राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण दिले मात्र कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या परिपत्रकातील सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठाण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी वर्तकनगर, कॅडबरी चौक, यासह चार ठिकाणी आंदोलन केले. बारावीची परीक्षा लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात घोषणबाजी आणि परीपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. तर, रास्ता रोको करण्यापूर्वी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यास अटकाव करीत आंदोलनकर्त्यांना अटक केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thane Maratha Agitation
Kolhapur News : जयंतराव पाटलांचा वेगळा डाव? प्रतीक पाटलांच्या चर्चेमुळे शेट्टी-मानेना धसका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. या निर्णयाचे ठाणेकरांनी स्वागत केले. मात्र त्याचवेळी ओबीसी मधून मराठ्यांना हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आंदोलन केली आहेत. आजही त्याचे उपोषण सुरू आहे. हे आंदोलन थांबविण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले आणि कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत, त्यांच्या सगेसोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली.

मात्र त्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. सहा लाख हरकती आल्याने त्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळात घेतली आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे.

त्यानुसार आज राज्य भरात रास्ता रोको करण्यात आले. यामध्ये आंदोलक दत्ता चव्हाण, डॉ. पांडुरंग भोसले, कृष्णा पाटील, दिनेश पवार, निखिल जाधव, सागर भोसले, प्रवीण कदम, सूरज कोकाटे, विश्वास पाटील, रमेश चौधरी, शरद जगदाळे, तानाजी पोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Thane Maratha Agitation
Nana Patole Vs Dhananjay Mahadik: महाडिकांना पटोलेंचा सूचक इशारा; 'आम्हीही बोलू शकतो, पण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com