Marathi Vijay Melava: स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे मराठी जनांना करताहेत..'चलो वरळी'चे आवाहन

Thackeray brothers unity language protest rally: लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा, मराठी जनांनी आपला प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडवले, पण सध्याचे 'मिंधे' फडणवीस सरकार मराठी विजय उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही.
An emotional moment as Uddhav and Raj Thackeray stand united under the legacy of Balasaheb Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
An emotional moment as Uddhav and Raj Thackeray stand united under the legacy of Balasaheb Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.Sarkarnama
Published on
Updated on

मराठीच्या मुद्दांवरुन राज-उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. थोड्यात वेळात 'आवाज मराठीचा'निमित्ताने ठाकरे बंधूंच्या तोफा धडाडणार आहेत. यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आजच्या विजय मेळाव्यावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्राच्या भूमीवर, मुंबई नगरीत मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होत आहे. मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे कमीच येतात. दिल्लीत सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूंनी प्रहार सुरूच आहेत.

महाराष्ट्राची, मराठी जनांची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत. अशा स्थितीत दिल्लीश्वरांनी लादलेले हिंदी सक्तीचे फर्मान उधळून मराठी माणसाने मराठी म्हणून विजयाचा एल्गार केला आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

An emotional moment as Uddhav and Raj Thackeray stand united under the legacy of Balasaheb Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
Marathi Vijay Melava live updates: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वी मनसैनिक ताब्यात; दादर पोलिसांची कारवाई

खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठे सभागृह पेलणार नाही. त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते. लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा, मराठी जनांनी आपला प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडवले, पण सध्याचे 'मिंधे' फडणवीस सरकार मराठी विजय उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही. त्यामुळे आजचा विजय सोहळा शिवतीर्थावर होऊ शकत नाही.

अर्थात, तरीही मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलेच आहे. जणू स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मराठी जनांना 'चलो वरळी'चे आवाहन करीत आहेत, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

काय म्हटलं सामनाच्या अग्रलेखात...

  • आज मराठी जनांची स्थिती ही कोंडीत सापडलेल्या वाघासारखी झाली आहे. मराठी जनता महाराष्ट्र राज्यातच असली तरी तिला त्राता-पिता कोणीच नाही, अशी वास्तव अवस्था आहे. वरवर पाहता सर्व काही आमचेच आहे असे दिसते, पण किंचित खोलवर डोकावून पाहता आमचे हक्काचे, न्यायाचे असे कोणीच नाही.

  • मराठी भाषेला, अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे (मिंधे) यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून ‘जय गुजरात’चा नारा दिला. हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.

  • आतापर्यंत उघडपणे एकाही मंत्र्याने महाराष्ट्रात राहून ‘जय गुजरात’चा नारा दिला नव्हता. तो या शहा सेनावाल्यांनी दिला. केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे.

  • अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे.

  • गुजरात फॉर्म्युला रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही व मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com