Corruption In Education Department: शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार: शिक्षण आयुक्तांची 40 अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

Maharashtra Politics: सुरज मांढरे यांनी याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे
Maharashtra Politics | Suraj Mandhare
Maharashtra Politics | Suraj MandhareSarkarnama
Published on
Updated on

Education Department News: राज्याच्या शिक्षण विभागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरु असून राज्यभरातील ३६ शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्ती सुरज मांढरे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी एसीबी'लाही पाठल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यात शिक्षण विभागात गैरव्यवहार सुरु असल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) यांना ५० हजाराची लाच घेताना अटक केली. काही महिन्यांपुर्वी सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्याही गैरव्यवहार समोर आले होते.

Maharashtra Politics | Suraj Mandhare
Madhya Pradesh Election 2023: 'आरएसएस'च्या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येणार; काँग्रेसचा दावा

या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सूरज मांढरे यांनी थेट लाचलुचपत विभागालाच पत्र लिहून शिक्षण विभागातील ३६ ते ४० अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. जानेवारी २०२३ मध्येच त्यांनी लाचलुचपत विभागाला हे पत्र लिहीले होते. शिक्षण अधिकारी, उपसंचालक लाखो रुपयांची लाच घेतात.पकडलेही जातात, पण पुढे काय होते. अशा अधिकाऱ्यांची खुली चौकशी व्हावी, यासाठी जनतेनेच पुढे येऊन हे सांगायला हवं. या लोकांनी कशी लाच घेतली आणि कुठे कुठे संपत्ती जमा केली आहे. अशी प्रतिक्रिया सूरज मांढरे यांनी दिली आहे. (Education Corruption)

Maharashtra Politics | Suraj Mandhare
Supriya Sule Tweet : केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सुप्रिया सुळे म्हणतात..

अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची खुली चौकशी झाली तर ते जनतेच्या समोर येतील. शिक्षकांच्या रजा, वैद्यकीय रजा, मंजूर करणे, बिले घेणे, संच मान्यता, इथपासून ते बदलीपर्यंत सर्व ठिकाणी शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे, या सर्व गोष्टी स्वत: शिक्षण आयुक्तांच्याच लक्षात आल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांची आम्हाला माहिती मिळाली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षकांनी दिलीआहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com