'मातोश्री'साठी काहीही; कलानगरमधील नाल्यांवर लवकरच फ्लडगेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानाच्या परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महापालिका मिठी नदीची नाकाबंदी करणार आहे. मिठी नदीचे पाणी 'मातोश्री' परिसरात येऊ नये म्हणून नाल्यांच्या मुखावर फ्लडगेट बसवण्यात येणार आहेत
Flood Gates to Protect Matoshree from Mithi River Floods
Flood Gates to Protect Matoshree from Mithi River Floods

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानाच्या परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महापालिका मिठी नदीची नाकाबंदी करणार आहे. मिठी नदीचे पाणी 'मातोश्री' परिसरात येऊ नये म्हणून नाल्यांच्या मुखावर फ्लडगेट बसवण्यात येणार आहेत. 

वांद्रे-कुर्ला संकुल उभारताना मिठी नदीवर फ्लडगेट बसवण्याचा निर्णय झाला होता; मात्र आता मिठी नदीत कलानगरमधून पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर फ्लडगेट बांधले जाणार आहेत. कलानगर परिसर समुद्रसपाटीच्या खाली असल्याने पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा होताना अडचणी येतात. समुद्राला भरती आल्यावर कलानगर परिसरातील पाणी वाहून जात नाही. 

या भागातील नाल्यांमधील पाण्याचा निचरा मिठी नदीत होत असल्याने भरतीच्या वेळात मिठी नदीचे पाणी थेट कलानगरमधील नाल्यांपर्यंत येते. त्यामुळे पावसात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येतात. यावर उपाय म्हणून कलानगर परिसरातील नाल्यांवर फ्लडगेट बसवण्यात येणार आहेत. या फ्लडगेटचे चेंबर बांधण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. कलानगर परिसरात नऊ नाले आहेत. समुद्राला भरती आल्यावर मिठी नदीचे पाणी फ्लडगेट बंद असल्याने नाल्यांमध्ये येईल. त्या ठिकाणी पंप बसून कलानगर परिसरातील पाण्याचा निचरा करता येईल.

मिठी नदी, माहीम खाडीला प्रतीक्षाच

26 जुलै 2005 नंतर महापालिकेने शहरातील सार्वजनिक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यास सुरुवात केली. 2009 पासून महापालिकेने विशेष बाब म्हणून कलानगर परिसरात स्वतंत्र पंप बसवला होता; परंतु दरवर्षी मोठ्या पावसात 'मातोश्री'चा परिसर पाण्याखाली जातो. 1970 च्या दशकात कुर्ला-वांद्रेदरम्यान दलदलीच्या जमिनीवर वांद्रे-कुर्ला संकुल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नियुक्त करण्यात आलेल्या मिराणी समितीने मिठी नदी आणि माहीमच्या खाडीच्या मुखावर फ्लडगेट बांधण्याची शिफारस केली होती. हे फ्लडगेट अद्याप बांधण्यात आलेले नाहीत.

काय होणार?

- फ्लडगेटसाठी चेंबर; अंदाजित खर्च : 87 लाख
- चेंबर बांधल्यानंतर 9 नाल्यांच्या मुखावर फ्लडगेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com