Tuljabhavani Mata Mandir: तुळजाभवानी मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार; शेलारांच्या बैठकीत निर्णय

Meeting in fifteen Days for Restoration of Tulja Bhavani Temple: मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्यात आले होते. त्याचा अहवालही समोर आला आहे.
Tuljabhavani Mata Mandir news
Tuljabhavani Mata Mandir newsSarkarnama
Published on
Updated on

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे.पुढील पंधरवड्यात गाभाऱ्यासह मंदिर दुरुस्तीचा कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मंदिराच्या गाभार्‍यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर मंदिराचे शिखर ज्या ४ दगडी तुळईवर उभारण्यात आले आहे. त्यापैकी २ शिळांना आरपार तडे गेल्याची बाब समोर आली. या अनुषंगाने मंदिराचे संरचनात्मक परीक्षण( स्ट्रक्चरल ऑडिट )करण्याच्या अनुषंगाने ही बाब तत्व आपण पुराविभागाच्या निदर्शनास आणून दिली, असे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

आशिष शेलार यांच्या मंत्रालयातील दालनात श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार संदर्भात बैठक घेण्यात आली. साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान असणाऱ्या पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचा आढावा घेण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्यात आले होते. त्याचा अहवालही समोर आला आहे.

Tuljabhavani Mata Mandir news
Sanjay Raut: AAP ला सत्तेपासून खाली खेचण्यास काँग्रेस अन् केजरीवालच जबाबदार!

गर्भगृहासह मंदिराची दुरुस्ती करताना दगडांना नंबर टाकून पूर्ण वास्तू उतरवून परत एकदा तेच दगड वापरत नव्याने जुन्या पद्धतीत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाणार आहे. बैठकीस पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव नंदा राऊत, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहने, सल्लागार आफळे आदी उपस्थित होते.

विश्वस्त, पुजारी, अभ्यासक यांचीही होणार बैठक

बैठकीत तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून मंदिराचा कळस ज्या 4 दगडी तुळईवर स्थित आहे, त्यापैकी दोन शिळांना पूर्णता तडे गेल्याचे शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले.

गाभाऱ्याची दुरुस्ती करताना तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीला धोका संभावू शकतो. त्यामुळे तुळजाभवानी देवीजीची मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने इतरत्र हलविणे आवश्यक आहे. त्यासाठी मंदिराचे प्रमुख व धार्मिक प्रमुख यांची बैठक घेण्याचे ठरले. दैनंदिन धार्मिक विधिबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांचीही बैठक घेण्याचे ठरले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com