मुंबई : राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी सर्व पक्षांची भागमभाग सुरू आहे. प्रामुख्याने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच सरकारला समर्थन असलेले इतर छोट्या पक्षांचे व अपक्ष आमदारांशीही सतत संपर्क साधला जात आहे. तर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसह इतर आमदारांची बैठक घेतली. (Rajya Sabha Latest Marathi News)
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. कडू यांच्यासह त्यांच्या संघटनेचे दोन आमदार आहेत. कडू यांनी हरभरा आणि धानासाठी अनुदानाची मागणी केली आहे. त्यावरून त्यांनी नुकतंच सुचक वक्तव्यही केलं होतं. (Minister Bacchu Kadu absent in meeting for CM)
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीली नाराज आमदार आशिष जैस्वाल हे उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेचा जीव भांड्यात पडला आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील, नीता जैन, शंकरराव गडाख, नरेंद्र भोंडेकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, मंजुळा गावीत, किशोर जोरगेवार या आमदारांनीही बैठकीला उपस्थिती लावल्याचे समजते. सुमारे 55 आमदार या बैठकीला असल्याची माहिती आहे.
अबू आझमीही नाराज
समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) नवीन तिढा निर्माण केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्राला उत्तर आल्यानंतर विचार करू, असं आझमींनी म्हटलं आहे. तसेच पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला आहे. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नाही. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर बोलताना आझमी म्हणाले की, शिवसेनेनं अडीच वर्षात आमच्यासाठी काय केलं. आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणं शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.