सुरेश खाडेंनी धाडस दाखवले... `झेंगट` मागे लागणारा बंगला घेतला..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून कॅबिनेट मंत्र्यांना बंगले वाटप
Suresh Khade
Suresh Khadesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना बंगल्यांचे वाटप केले. त्यातील बड्या आणि ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या पसंतीनुसार बंगले मिळाले आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना `रॉयल स्टोन` ,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना `सेवासदन` तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना `पर्णकुटी` हा बंगला मिळाला आहे. शिंदे गटातील प्रवक्तेपद सांभाळणारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या `वर्षा` शेजारचा `शिवनेरी` हा बंगला देण्यात आला आहे. फडणवीस यांच्याकडे `सागर` बंगला आधीपासून आहे. याशिवाय त्या शेजारचा `मेघदूत`ही बंगला त्यांना मिळाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना त्यांच्या मागणीनुसार देवगिरी हे निवासस्थान कायम ठेवण्यात आले आहे.

Suresh Khade
नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

`रामटेक` हा बंगला खरे तर मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यासाठी असल्याचा अलिखित संकेत आहे. मात्र या बंगल्यात राहणाऱ्याचे मंत्रीपद जाते. आरोप मागे लागतात असेही दिसून आले आहे. मात्र या वेळी कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी हा बंगला स्वीकारला आहे. या बंगल्यात छगन भुजबळ, एकनाथ खडसे या नेत्यांचे वास्तव होते. त्यानंतर त्यांना बऱ्याच कटकटींना तोंड द्यावे लागले. भुजबळ हे 1999 ते 2014 या बंगल्यात वास्तव्यास होतो. त्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. एकनाथ खडसे यांना 2019 मध्ये हा बंगला मिळाला. त्यांनाही पद सोडावे लागले आणि अनेक कटकटी त्यांच्या मागे सुरू झाल्या. हा बंगला निवासासाठी चांगला आहे. पण त्यात जाणाऱ्यांना धास्ती बसावी, अशी परिस्थिती आहे.

Suresh Khade
पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

अधिवेशनाचा कालावधी संपताच मंत्री त्यांना मिळालेल्या निवासस्थानी रहायला जातील.अन्य मंत्र्यांनाही लवकरच घरे मिळतील. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी काही घरांचे सुशोभीकरण केले होते, त्या घरांना पसंती दिली जाते आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री पुन्हा नव्याने या बंगल्यासाठी खर्च करणार का, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com