Mira Road Crime News : दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकांडातील क्रूरता अजूनही विसरले नाहीत. या प्रकरणाता क्रूरतेचा कळस गाठला गेला होता. हे प्रकरण विस्मरणात गेले नसतानाच आता मुंबईजवळील मिरा रोड (Mira Road Crime News) परिसरातूनही अशाच एका हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. (Latest Marathi News)
मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहणाऱ्या एका 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या 32 वर्षीय प्रेमिकेचा धारदार शस्त्राने खून करून, मृतदेहाचे अनेक लहान लहान तुकडे करून, विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी (Mira Road Police) 56 वर्षीय प्रियकर मनोज शहाणे (Manoj Shahane News) यास अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मीरा रोड (Mira Road News) येथील गीता नगर फेज सेवन (Gita Nagar Phage News) परिसरातील आकाशदीप सोसायटीत (Akash Deep Society) सातव्या मजल्यावर एका बंद फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याबाबतची तक्रार मिरा रोड नया नगर पोलीस ठाण्यात (Naya Nagar Police Station) आली होती.
या तक्रारीनुसार नया नगर पोलिसांनी आकाशदीप सोसायटीत जाऊन त्या बंद फ्लॅटचे टाळे तोडून पाहणी केली असता, घरात महिलेचे मृतदेहाचे तुकडे आढळून आले. यासंदर्भात शेजारी आणि इतर नागरिकांची विचारपूस केली असता त्या ठिकाणी एक 56 वर्षीय व्यक्ती आपल्या प्रेयसी सोबत भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली.
नया नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली असता, गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपीचा शोध लावून त्यास अटक केली.
मनोज शहाणे (५६)आणि सरस्वती वैद (Sarswati Vaidya) (32 वर्ष) हे दोघे मागील अनेक महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणे होत होती. याच वादावादीतून मनोज शहाणे याने सरस्वती वैद या महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करून, काही तुकडे फेकून देखील दिले आहेत. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याबाबतचा अधिकचा तपास नया नगर पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.