शरद पवारांनी जे केले तेच मकरंद पाटील वाईत करणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी सातारा जिल्ह्यासाठी 125 इंजेक्‍शन पाठवली होती. वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्‍शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत.
MLA Makrand Patil
MLA Makrand Patil
Published on
Updated on

वाई : कोरोनावर लस उपलब्ध होईपर्यंत वाई मतदारसंघातील कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्‍शन्स महागडी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ती विकत घेणेही परवडत नाही. त्यासाठी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात पाचशे इंजेक्‍शनची बॅंक करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
 
 गरजू रुग्णांसाठी इंजेक्‍शन्स मोफत उपलब्ध करून देण्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात पाचशे इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतीने ४१ इंजेक्‍शन्स दिली आहेत.

वाई शहर व तालुक्‍यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला असून ही मंडळेही 50 इंजेक्‍शन देणार आहे. वाई जैन समाजाने 25 इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील अनेक घटक पुढे आले असून ते या कामात योगदान देत आहेत. त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनची मदत करावी, असे आवाहन केल्यानुसार महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्‍शन आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ही इंजेक्‍शन महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती घेणे परवडत नाहीत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी सातारा जिल्ह्यासाठी 125 इंजेक्‍शन पाठवली होती. वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्‍शन मिळाली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत. 

गरजूंनाच इंजेक्‍शन देणार...
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दररोज 50 ते 100 कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा पुणे, मुंबई, सोलापूरशी संपर्क होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमेडीसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. सध्या वातावरणातील बदल आणि चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मतदारसंघात पाचशे इंजेक्‍शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. ही इंजेक्शनस्‌ गरजूंना दिली जातील.
- मकरंद पाटील (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com