BJP News: कल्याण भाजपचे पदाधिकारी गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पाठीशी; बैठकीत निर्णय

Maharashtra Politics:कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.
Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan: कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे पडसाद आता उमटत आहेत.

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद आणि भाजपमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा उफाळली आहे. एकीकडे शिवसेनेकडून महेश यांच्या समर्थनार्थ शहरात बॅनर लावले जात आहेत. तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची कल्याण मध्ये बैठक झाली. बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठामपणे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठकीत हा निर्णय झाला.

गोळीबाराच्या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ महेश गायकवाड समर्थकांनी बॅनर लावलेत तर दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही बैठक संघटनात्मक होती, कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये, पक्षाचे विविध कार्यक्रम राबवले जावेत यासाठी ही बैठक होती, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत संघटनात्मक कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी कल्याण पूर्वतील भाजप पदाधिकारी ठामपणे असल्याची देखील सांगण्यात आल्याची माहिती दिली.

Ganpat Gaikwad
Kolhapur: 'बॉस इज ऑलवेज नॉट राईट', अधिकाऱ्यांचा भांडाफोड करण्यासाठी अभियंत्याने भरले 5 लाख, तरीही....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com