Ganpat Gaikwad : कल्याणमध्ये गणपत गायकवाडांचे फोटो झळकले; काय आहे कारण?

Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी सक्रीय; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळयासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड पाठपुरावा केल्याचा बॅनर उल्लेख
BJP Banner
BJP BannerSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या बॅनरमुळे आमदार गायकवाड यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या बॅनरवर या स्मारकासाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा त्याची कागदपत्रे यांसह भाजप नेत्यांचा फोटो झळकवण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) गटातील एकाही नेत्याचा फोटो छापणे भाजपने टाळले आहे.

कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या 5/ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकातील पूर्णाकृती पुतळयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहॆ. यासाठी पालिका प्रशासन व शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर देखील लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरमध्ये भाजपचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी हे बॅनर लावले आहेत.

BJP Banner
Lok Sabaha Election 2024 News: ‘चंद्रहार’च्या हाती ठाकरेंची मशाल, विशाल पाटलांना गाठले खिंडित, नाराजी उफाळणार...

त्या बॅनरवर हे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळयासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पाठपुरावा केला आहे. बॅनरवर केलेल्या पत्रव्यवहाराचे फोटो भाजप आमदार गणपत गायकवाडांचा फोटो, आमदार यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा फोटो आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री कपिल पाटील, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचाही फोटो आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना नेत्याचे फोटो लावले नाहीत. परिणामी कल्याम लोकसभा मतदारसंघातील भाजप विरुद्ध शिवसेना वाद शमला नसल्याचे स्पष्ट होत आहे. या माध्यमातून सुलभा गायकवाडांनी राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजप आमदार गायकवाड हे सध्या गोळीबार प्रकणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी उतरल्या असून त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे शिवसेनेला काटे की टक्कर या मतदारसंघातून दिली जात असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद काय वळण घेतो, की वरिष्ठ हा वाद शमवण्यात यशस्वी हातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

BJP Banner
Tanaji Sawant : पक्षनिधी, ठाकरे अन् ओमराजे; गेल्या निवडणुकीत काय झालं सावंतांनी सगळंच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com