Tanaji Sawant : पक्षनिधी, ठाकरे अन् ओमराजे; गेल्या निवडणुकीत काय झालं सावंतांनी सगळंच सांगितलं

Omraje Nimbalkar, Uddhav Thackray : 2019 विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचे ठरले होते. त्यावेळेस सर्वात आधी उद्धव ठाकरेंना फोन करून जाब विचारला होता.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

Dharashiv Political News : उद्धव ठाकरे यांना जेव्हा दहा कोटी चेकने पक्ष निधी दिला, त्यानंतरच ओमराजे निंबाळकर यांचे नाव लोकसभेसाठी उमेदवार म्हणून अंतिम झाले. पक्षनिधीनंतर निवडणुकीतही कोटीभर रुपये खर्च केले. बेरोजगार असलेल्या ओमराजेला (Omraje Nimbalkar) खासदार करून दिल्लीला पाठवले. तुम्ही मला पित्यासारखे आहात म्हणून झुकणाऱ्याने ऐनवेळी निवडणुकीपूर्वी पलटी मारली, अशा शब्दात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.

आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) रविवारी (ता. 10) दहिगाव येथील सिना कोळेगाव प्रकल्पाची शेतकऱ्यांसह पाहणी केली. यावेळी ते आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बेरोजगार खासदाराला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की तुझे तिकीट मिळवण्यासाठी खमक्या म्हणून उभा राहिलो. त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दहा कोटी रुपये चेकने दिले. त्यानंतरच तुझे तिकीट आणले. तुझ्यावरती एक कोटी रुपये खर्च केला आणि निवडून आणले. आता त्यांनी अचानकच पटली मारली. तुम्हाला मान्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांसमोरच केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tanaji Sawant
Harshvardhan Patil Vs Ajit Pawar : इंदापुरात लढाई आरपारची? लोकसभेआधीच हर्षवर्धन पाटलांची विधानसभेची तयारी

सावंतांनी ठाकरेंवरही सडकून टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यानंतर म्हणता की बाळासाहेबांचा पक्ष तोडला ? पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही तर अगदी पायदळी तुडवले. आता पुन्हा सत्तेसाठी, एकट्या लेकराच्या रोजगारासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला, असा हल्लाबोलही ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला.

Tanaji Sawant
Eknath Shinde Shivsena : ठाण्याची ठाणेदारी की कल्याणची सुभेदारी! शिंदेंचे घोडे नेमके अडले कुठे ?

2019 विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचे ठरले होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील हा पहिला शिवसैनिक तानाजी सावंत आहे त्याने थेट फोन करून उद्धव ठाकरे यांना विचारले होते. साहेब तुम्ही जो निर्णय घेत आहे तो बरोबर आहे का? त्यावर ते म्हणाले हो असेच ठरले आहे.

त्यावर त्यांना म्हणालो, की एक लक्षात ठेवा मला राजकारणाचा माझ्या बापाचा वारसा नाही . ना माझ्या घरी खासदारकी आमदारकी काही नाही. पण आयुष्यभर पहिली ते पीएचडी पर्यंत म्हणून रँकर म्हणून माझा आयुष्य जगलो आहे. मला माझ्या बापाची शिकवायची ऐपत नव्हती. बँकेचे कर्ज काढून मी शिकलो आहे. चप्पल नसताना लेक्चर घेतलेला माणूस आहे.

साहेब, आयुष्यभर शरद पवारांच्या (Sharad Pawar) वळचणीला आमचे घर गेले नाही. 1988 पासून शिवसैनिक आमच्या घरात आहे. आमचे बाळकडूच शिवससैनिक आहे. शरद पवारांना ऐकले, वाचले, प्रॅक्टिकली बघतो. त्या पवारांचा हात त्याच्यावरती तो भस्म होतो. जर आपला शिवसेना पक्ष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधत असाल तर तो आत्मघात ठरेल. शिवसेना संपेल, असेही म्हटल्याचे सावतांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Tanaji Sawant
Bharat Jodo Nyay Yatra : शरद पवार अन् राहुल गांधी इंडिया आघाडीत 'असा' भरणार हुंकार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com