Gopichand Padalkar On Sanjay Raut : 'पोपटा' चा लेख वाचला.. ! भाजप आमदाराला तुकोबारायांचा अभंग आठवला.. ; ‘गाढव शृंगारीले कोडे।काही केल्या नोहे घोडे...

India alliance meet news : पडळकरांनी टि्वट करीत संत तुकारामांच्या अंभगाच्या दाखला देत राऊतांची खिल्ली उडवली आहे.
Sanjay Raut, Gopichand Padalkar
Sanjay Raut, Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : "देशातील राजकारणातील 28 प्रमुख राजकीय पक्षाचे दिग्गज नेते मुंबईत एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच," अशी बोचरी टीका 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पडळकरांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. अग्रलेख वाचून पडळकरांना संत तुकाराम महाराज यांचा अभंग आठवला. पडळकरांनी टि्वट करीत संत तुकारामांच्या अंभगाच्या दाखला देत राऊतांची खिल्ली उडवली आहे. 'पोपटा'च्या 'सामना'तील लेख वाचला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला,अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

Sanjay Raut, Gopichand Padalkar
Jalna Maratha Protest : आंदोलनाची 'दोन फुल - एक हाफ' ना कल्पना नव्हती का ? ठाकरेंचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र

‘इंडिया’ आघाडीचे युद्ध हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे.सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापी संपलेले नाही, असे ठाकरे गटाने अग्रलेखात नमूद केले आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की..

  • चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकूमशहाला दरदरून घाम फुटतो. त्याला वाटते की, ते आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत.

  • इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील 28 प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते दोन दिवस एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच

  • स्वातंत्र्यपूर्व काळात एक वर्ग असा होता की, त्यांना ‘ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे. या देशातील बजबजपुरी नष्ट होऊन येथे कायद्याचे, सामाजिक सुधारणेचे राज्य निर्माण होईल.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com