president election : शिंदे गटाला धक्का ; एक आमदार मतदानास अपात्र

राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील महाराष्ट्रातील २८८ पैकी २८३ आमदार मतदानास पात्र होते.
mahendra dalvi
mahendra dalvisarkarnama

मुंबई : देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीसाठी आज मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठा झटका बसला आहे. शिंदे गटातील एका आमदाराला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता आले नाही. (president election 2022 latest news)

राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील महाराष्ट्रातील २८८ पैकी २८३ आमदार मतदानास पात्र होते. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने ते मतदानास येऊ शकले नाही. शिवसेनेतील एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरूंगात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे २८३ आमदारांना मतदानास पात्र होते.

शिंदेगटातील आमदार महेंद्र दळवी (mahendra dalvi) यांना मतदान करता आले नाही, कारण एका गुन्ह्यात दळवी हे आरोपी असल्याचं सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांसह एकूण 10 लाख 81 हजार 991 मते आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा बहुमताचा आकडा 5 लाख 40 हजार 996 आहे. मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात आहे.

mahendra dalvi
Sanjay Raut : सोमय्या-राऊत 'सामना' पुन्हा रंगणार ; राऊतांना समन्स

यासाठी महेंद्र दळवींना मतदान करता आले नाही..

  1. आमदार महेंद्र दळवी हे शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत.

  2. अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षांपूर्वी मारहाण प्रकरणात शिक्षा दिली होती.

  3. निवडणुकीवरून दोन गटात तीन वर्षांपूर्वी हाणामारी झाली होती.

  4. यामध्ये एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.

  5. दळवी यांच्यासह अन्य तिघांना दोन वर्षांचा कारावास असा निकाल १३ मे रोजी आला होता.

  6. या प्रकरणी दळवींकडून आता पुढील पर्यायांची चाचणी सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com