Maharashtra Politics: एका स्त्रीला आयुष्यात अनेक रुपांतून आणि भूमिकेतून जावे लागते. कधी मुलगी, कधी सून, पत्नी, कधी आई तर कधी सासू. या प्रत्येक भूमिका पार पाडताना महिला सर्वस्व झोकून देतात. त्यात सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या महिलांवर तर या भूमिकांसह समाजाचीही जबाबदारी असते. अशाच दोन रुपांतील कर्तव्यात बुधवारी (ता. ८) आमदार नमिता मुंदडा (Namita Mundanda) पहायला मिळाल्या.
नमिता मुंदडा (Namita Mundada) केज मतदार संघाच्या आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी त्या आमदार म्हणून आपल्या मतदारसंघासाठी हजर राहिल्या. मतदारसंघाची जबाबदारी पार पडताना त्यांना आईचेही कर्तव्य पार पडावे लागत आहे. त्यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. त्या चिमुकलीसह आमदार मुंदडा अधिवेशनाला हजर राहिल्या.
केज मतदार संघाचे (Kaij Constituency) भाजपकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या नमिता मुंदडा (Namita Mundada) यांना वियाना ही दोन वर्षांची आणि निया ही दोन महिन्यांची मुलगी आहे. त्यांना दोन्ही मुलींची काळजी घेण्याबरोबरच मतदार संघातील प्रश्नही अधिवेशनात मांडायचे आहेत.
सध्या मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने नमिता मुंदडा नियमित हजर राहत आहेत. त्यांनी काही लक्षवेधी, काही तारांकित प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काही चर्चेतही सहभाग नोंदविला आहे.
बुधवारी महिला दिनाच्या दिवशी नमिता मुंदडा चिमुकलीची आई आणि केजच्या आमदार या दोन्ही कर्तव्य पार पाडताना विधीमंडळात दिसल्या. आपल्या नीया या दोन महिन्यांच्या चिमुकलीला पोटाशी धरुन त्या मतदार संघातील प्रश्न मांडण्यासाठी हजर राहिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.