Rohit Pawar News : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा आनंद गगनात मावेना; नेमकं काय घडलं..?

Rohit Pawar Stages Protest In Maharashtra Assembly : आमदार रोहित पवार दोन वर्षांपासून कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी संघर्ष करत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज उपोषणाला बसले होते.
Rohit Pawar and CM Eknath Shinde
Rohit Pawar and CM Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : आमदार रोहित पवार यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कर्जत-जामखेडच्या पाटेगाव खंडाळामधील एमआयडीसीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. जुलैअखेरपर्यंत यावर कार्यवाही होईल, अशी माहिती विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसलेले आमदार रोहित पवार यांनी माध्यमांना दिली.

गेल्या दोन वर्षांपासून कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी बाबत आमदार रोहित पवार पाठपुरावा करत आहेत. मुंबईतील पावसाळी अधिवेशनात सुरवातीलाच रोहित पवार (Rohit Pawar) एमआयडीसीच्या मुद्यावर आक्रमक झाले होते.

भाजपचे आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष या अधिवेशनात देखील पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी या अधिवेशनात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसले होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घडवून आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा यांच्यासह प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आमदार पवार बैठकीनंतर हसतच बाहेर पडले. त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.

मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे कोणाला सांगू अन् कोणाला नको, असं त्यांना झाले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समोर आल्यावर त्यांना भेटून मुख्यमंत्र्यांच्या कार्यवाहीच्या आश्वासनाची माहिती रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar and CM Eknath Shinde
Congress Big Breaking News : काँग्रेसचे चारजण कोण फुटणार ? कुणाचा बाप, कुणाचा नवरा, टोपीवाला अन् नांदेडवाला; 'या' आमदाराचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी बाबत बैठक झाली. त्यांनी होणार म्हणजे होणारच, असे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. याशिवाय या बैठकील उदय सामंत देखील उपस्थित होते. त्यांनी जुलै अखेरपर्यंत कार्यवाहीला सुरवात होईल सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शब्द दिला असल्याने आम्हाला काम करावेच लागेल, असे सामंत यांनी म्हटल्याचेही पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्री यांनी शब्द दिल्याने आमची एमआयडीसी होणार असल्याचा आनंद आहे, असे सांगून हा लढा दोन वर्षांपासून सुरू होता. या बैठकीला काही अधिकारी उपस्थित होते. एमआयडीसी बाबत त्यांच्याशी देखील चर्चा झाली. ज्या काही त्रुटी आहेत, त्या देखील लगेच सोडवण्यात येतील. जुलै अखेरीस एमआयडीसीच्या कामाला प्रारंभ होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar and CM Eknath Shinde
Manoj Jarange on Girish Mahajan : 'गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन..' ; जरांगेंचं मोठं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com