'शिंदेसाहेब काहीही करा पण पवारांकडे नेऊ नका; नाही तर आपण संपलो!'

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu Patilsarkarnama

गुवाहाटी : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये राह्याचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही आरोप केले. गुवाहाटीमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी पवार यांच्यावर सडकून टीका केली.

या वेळी पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील हे माझ्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांना कधीही दगा देणार नाही, असे शरद पवार यांनी भाषणात सांगितले होते. त्यानंतर दिड वाजता, तिथच बातमी आली पवारांनी काँग्रेसचे ४० आमदार फोडले आणि वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्या ज्या माणसाला पवार यांनी जवळ घेतले, त्यांना संपवले, असा आरोप पाटील यांनी केला.

त्यानंतरही वसंतराव पाटील यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांना पवारांच्या सोबत राहण्यास सांगितले होते. मात्र, जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिले ते कुठेच नाहीत. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे हे राजीव गांधी यांच्याकडे पळून गेले त्यामुळे ते वाचले. शिंदेसाहेब काहीही करायला सांगा पण पवारांच्या जवळ नेऊ नका, नाहीतर आपण संपलो, असेही पाटील म्हणाले.

Shahajibapu Patil
'मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सोडलं, 'वर्षा' बंगला सोडला पण पवारांना सोडायला तयार नाहीत'

उजणी धरणातून सांगोला तालुक्याला दोन टीएमसी पाणी १९९७-९८ मध्ये मंजूर झाले आहे. मात्र, आजपर्यंत ते मिळाले नाही. त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात पत्र दिले. पण त्या पत्रावर अजून निर्णय झाला नाही. वसंतराव नाईक, वसंतराव दादा पाटील, शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या राज्याची प्रगती झाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Shahajibapu Patil
जगतापांशी न जुळल्याने शिवतारेंचीही उडी; शिंदे गटात दाखल होणारे तिसरे माजी आमदार

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर बोलताना पाटील म्हणाले, शिंदे साहेबांनी फोन बंद ठेवयला, सांगितले होते. मात्र, येथे आल्यानंतर काही आमदारांना फोनवर बोलताना पाहिले. त्यानंतर म्हटले आपण पण फोनवर बोलावे. त्यातच रफिक यांचा फोन आला. ते म्हणाले तुम्ही कुठे आहेत. त्यामध्ये मी बोलून गेलो काय झाडी, काय डोंगर, काय हॅाटील, ओक्के आहे सगळे, असे म्हणाल्याचे पाटील यांनी यावेळी आमदारांना सांगितले. यावर आमदारांमध्ये एकच हाश्या पिकला. पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे ते चांगलेच चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com