Sheetal Mhatre Viral Video: आमदार सुर्वेंची पोलिसात धाव; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

आमदार प्रकास सुर्वे यांच्या मुलाने राज सुर्वे याने दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Sheetal Mhatre - Prakash Surve
Sheetal Mhatre - Prakash SurveSarkarnama
Published on
Updated on

Dahisar Police Station: शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रकरणी अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली. यानंतर आता आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मॉर्फ व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिकारांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sheetal Mhatre - Prakash Surve
Rupali Patil : तो व्हिडीओ शिंदे गटानेच व्हायरल केला का? म्हात्रेंच्या व्हिडीओवर रुपाली पाटलांनी व्यक्त केली शंका

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.या रॅलीतील व्हीडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमधील हा व्हिडिओ आहे. 'मातोश्री'नावाच्या (Matoshree Page) फेसबूक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवरुन शिवसैनिक आक्रमक झाले होते.

पण दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र हा व्हिडीओ भाजपच्याच लोकांनी व्हायरल केल्याचा संशय व्यक्त केला आहे. '' तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय, त्या लोकांनीच तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही ना त्याचा तपास झाला पाहिजे.सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत आहोत. आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी.तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही रुपाली पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com