आघाडीची रात्रभर खलबतं; शिवसेनेकडून काँग्रेसला मिळणार 'बुस्टर डोस'?

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.
Mahavikas Aghadi Latest Marathi News, MLC Election 2022 Latest News
Mahavikas Aghadi Latest Marathi News, MLC Election 2022 Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवणुकीत झालेल्या पराभवामुळे विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या अस्तित्वासाठीच महत्वाची बनली आहे. एकेक मत महत्वाचं असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची खलबतं सुरू होती. काँग्रेसच्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने आपल्याकडील अतिरिक्त मतं देण्याबाबत बैठकीत जोरदार चर्चा झाल्याचे समजते. चर्चेअंती पहिल्या पसंतीची चार मतं काँग्रेसलकडे वळवण्याबाबत शिवसेना राजी झाल्याचे समजते. (MLC Election 2022 Latest Marathi News)

काँग्रसचे उमेदवार भाई जगताप यांना विजयासाठी आठ मतांची गरज आहे. तर शिवसेनेकडे दोन्ही उमेदवारांना मतं देऊनही चार मतं उरतात. ही मतं आपल्याला मिळावीत, यासाठी काँग्रेसनं जोर लावला होता. त्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेनेची मनधरणी सुरू होती, असे समजते.

Mahavikas Aghadi Latest Marathi News, MLC Election 2022 Latest News
Vidhan Parishad Election 2022 Live : उमा खापरे यांना पडलेल्या एका मतावर आक्षेप...

मविआचा एकही उमेदवार पडला तरी तो त्या पक्षाचा नव्हे, तर आघाडीचा पराभव असेल, असं काँग्रेसकडून बैठकीत सांगण्यात आलं. पण त्यावर कोणतेही आश्वासन न मिळाल्यावर अखेर मुंबई महापालिका निवडणूक सोपी जावी यासाठी सेना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची मर्जी तर राखू पहात नाही ना, असा टोकदार प्रश्न काँग्रेसने केल्याचे समजते. मध्यरात्री उशीरापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरु होता.

खासदार अरविंद सावंत हे सेनेचे प्रतिनिधी म्हणून बैठकीत सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसतर्फे मनधरणी सुरु ठेवली होती. राज्यसभेत सेना उमेदवाराला इजा पोहोचवण्याची आमची शक्तीच नव्हती, हे काँग्रेसनं पटवून दिलं. भाजप थेट राहुल गांधींना ईडीच्या माध्यमातून त्रास देत असताना ज्या वैचारिक मित्र नसलेल्यांना मुख्यमंत्री केले त्यांचा पक्ष एवढेही ऐकणार नाही का, असा प्रश्न केला गेला.

Mahavikas Aghadi Latest Marathi News, MLC Election 2022 Latest News
'समाजवादी'नंही पत्ते खुले केले; भाई जगतापांना करावी लागणार धावाधाव

अखेर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास तो आघाडी आणि मुख्यमंत्र्यांचाही पराभव असेल, ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली. सरकार एकजुटीचे आहे हे दाखवण्यासाठी मते देवू, असं अरविंद सावंत यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेची चार अतिरिक्त मतं मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास काँग्रेसचा विजय सोपा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com