Mira Bhayandar: मीरा भाईंदरच्या आमदारावर राग व्यक्त करीत भाजप नेत्याचा मनसेत प्रवेश; काय आहे कारण?

Mira Bhayandar BJP Vs MNS: मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर गुरूवारी परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. गुजराती व्यापाऱ्यांच्या याच मोर्चाविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
Mira Bhayandar BJP Vs MNS
Mira Bhayandar BJP Vs MNSSarkarnama
Published on
Updated on

राज्यात मराठी-हिंदी वाद पेटला असताना मीरा भाईंदरमध्ये मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला आहे. या घटनेनंतर मीरा भाईंदर परिसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला.झालेल्या घटनेच्या निषेध व्यक्त करीत व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, तर तो भाजप पदाधिकाऱ्यांनी काढलेला मोर्चा होता, असा आरोप करीत मनसे आक्रमक झाली आहे. या मोर्च्यावर नाराजी व्यक्त करीत, स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर तीव्र रोष व्यक्त करीत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

मीरा मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर गुरूवारी परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. गुजराती व्यापाऱ्यांच्या याच मोर्चाविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

व्यापाऱ्यांच्या मोर्चाच्या नियोजनामागे भाजपचा हात होता, असा घणाघात अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.मराठी माणसापुढे भाजपला झुकावे लागले, अध्यादेश रद्द करावा लागला. त्याचाच राग म्हणून भाजपने आजचा मोर्चा काढला, असे जाधव म्हणाले.मतांच्या राजकारणासाठी भाजपने हे सर्व घडवून आणले, त्यांना मराठी माणसांचे काही पडलेले नाही, असे ते म्हणाले.

Mira Bhayandar BJP Vs MNS
Hindi Row: मराठी की हिंदी उडतसे धुरळा, सोयीचा हा सोहळा साऱ्या दांभिकांचा!

मराठीत न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण झालेल्या घटनेवर जाधव म्हणाले, "आम्ही आमच्या भाषेसाठी कडवट आहोत, हे सगळे जाणतात. आमच्याशी चार शब्द मराठीत प्रेमाने बोलावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. व्यापाऱ्याची उत्तरे आणि उर्मटपणा पाहून महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या कानशि‍लात लगावली,"

"आमचे महाराष्ट्र सैनिक त्याला नम्रपणे विचारीत होते, त्याच्याशी बोलत होते. परंतु महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात, असे उद्धट उत्तर त्या व्यापाऱ्याने दिले. असे उत्तर ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिक कसे शांत बसतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com