अयोध्या दौरा बारगळला? राज ठाकरे कडाडले पण ब्रिजभूषण सिंहांवर बरसलेच नाहीत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात सभा झाली.
Raj Thackeray, Brij Bhushan Singh Latest Marathi News
Raj Thackeray, Brij Bhushan Singh Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राणा दाम्पत्यासह खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. पण मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ते बरसलेच नाही. सिंह यांनी राज यांच्यावर अनेकदा शेलक्या भाषेत टीका केली आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर झाल्यानंतर लगेचच ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी विरोध सुरू केला होता. ठिकठिकाणी बैठका घेत त्यांनी जय्यत तयारीही सुरू केली होती. उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी आहे. माफी मागितली नाही तर अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. (MNS Raj Thackeray Ayodhya Visit Latest Marathi News)

Raj Thackeray, Brij Bhushan Singh Latest Marathi News
मधू इथे अन् चंद्र तिथे! हनुमान चालिसावरून राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला सुनावलं

हा वाद सुरू असतानाच राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर चर्चांना उधाण आले. त्यामुळे आजच्या सभेत या दौऱ्याबाबत ते काय बोलणार, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर बसरणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. पण सिंह यांच्यावर तोफ न डागता त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनाच लक्ष्य केलं. तसेच त्यांच्या काही वक्तव्यांमुळे अयोध्या दौरा बारगळल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच विरोध सुरू झाला. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातूनही माहिती मिळत होती. एक वेळ अशी आली की संपूर्णपणे लक्षात आलं, हा सापळा आहे. त्यात आपण अडकता कामा नये. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पोहचवली गेली. ज्यांना माझी अयोध्यावारी खुपली होती, असे अनेकजण होते. सगळ्यांनी मिळून आराखडा आखला गेला, असा दावा राज यांनी केला.

मी हट्टाने जायचं, असं ठरवलं असतं. तर अनेक हिंदू बांधव, महाराष्ट्र सैनिक तिकडे आले असते. पण तिथे काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या. जेलमध्ये सडवलं असतं. तो ससेमिरा तुमच्यापाठिशी लावला असता. आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही. ऐन निवडणुकीवेळी त्या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या अन् निवडणुकीवेळी इकडं कुणीच नसतं, असं सांगत राज यांनी किमान निवडणुकीपर्यंत तरी अयोध्येला जाणार नाही, असे सूचक संकेत दिले.

Raj Thackeray, Brij Bhushan Singh Latest Marathi News
भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मन जिंकलं! 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारी बसवलं...

ब्रिजभूषण सिंह यांच्याबद्दल काय म्हणाले?

एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का? माझी महाराष्ट्रातील ताकद तिकडं अडकली असती. मी शिव्या खायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही. राज ठाकरेंनी माफी मागावी, याची आता जाग आली. बारा-चौदा वर्षांनी आठवण झाली. त्यावेळी ही माणसं कुठे होती. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा राज यांनी दिला.

विषय माफी मागण्याचाच आहे ना. मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे गृहस्थ आहेत. गुजरातमध्ये उत्तर भारतीयाने एका मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलले. ते मुंबईत आले आणि नंतर उत्तर प्रदेशात गेले. तिथून कोण माफी मागणार आहे? हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. हे आता कसं सुरू झालं. ज्यांना आपलं हिंदूत्व, भोंग्याचा मुद्दा झोंबला, ते सगळं आपल्याविरोधात एकत्र आले, असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रतील नेत्यांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com