Raj Thackeray : 'मला बायको असून माहिती नव्हती,' असं राज ठाकरे का म्हणाले..

MNS chief Raj Thackeray speech : राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
 Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

MNS chief Raj Thackeray speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक अनेक आठवणींना उजाळा दिला. अभ्यासू नेते म्हणून राज ठाकरे यांची ओळख आहे. भाषणाच्या वेळी ते विविध संदर्भ देण्यासाठी मुद्दे लिहून आणतात.काही संदर्भ शोधताना त्यांना नुकतीच एक नवीन माहिती मिळाली. ती माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केली. त्यामुळे उपस्थितांसह खुद्द राज ठाकरेंनाही हसू आवरता आले नाही.

एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "सव्वाशे वर्ष या हिंदप्रांतावर मराठेशाहीने राज्य केलंय. यानंतर मोघल, ब्रिटीश, पोर्तुगीज आले, पण या हिंदप्रांतावर फक्त मराठेशाहीने राज्य केलं,"

"काही दिवसापूर्वी काही संदर्भ शोधताना मला नवीन माहिती मिळाली. 'बायको'हा शब्द मराठी नसून तुर्की आहे, हे मला बायको असूनही माहिती नव्हते," राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

"आजही मला भाषण देताना टेन्शन येतं, भाषणाच्या दिवशी हात थंड पडतात. कारण मी काय बोलणार हे मला माहित नसते. भाषणाच्या वेळी मी काही मुद्दे काढतो, पण ते बाजूला ठेवून माझे भाषण होते. मला ठरवून भाषण करता येत नाही, मनातून जे वाटतं ते बोलतो,"

"१९९१ मध्ये माझे एका ठिकाणी भाषण होते. माझे ते भाषण ऐकण्यासाठी माँ (मीनाताई ठाकरे) आली होती. त्यानंतर ती मला बाळासाहेबांकडे घेऊन गेली. बाळासाहेबांनी माझे ते भाषण घरी ऐकले होते. भाषणाच्या ठिकाणी स्पीकरवरुन एका फोनच्या माध्यमातून त्यांनी भाषण ऐकलं होते,"असे राज म्हणाले.

 Raj Thackeray
Amit Shah : पुरंदरेंचं स्वप्न सत्यात उतरतयं : अमित शाह ; शिवसृष्टीच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण

मैदानाची भाषा बोल

बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांनी दिलेला एक मंत्र मला सांगितला. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल, कसं बोललात हे महत्त्वाचं नाही, समोरच्या काय विचार करायला दिला हे विचार कर. आपण कसे शहाणे आहोत, हे सांगण्यापेक्षा ते कसे शहाणे होतील हे सांगावे, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला," असे राज ठाकरे यांनी सांगितले.

आपण मराठी, हिंदू आहोत हे लक्षात ठेवा

"जाती-पातीच्या भानगडीत पडू नका, मैत्री करता जात पाहू नका, जातीमुळे तुमच्या हाती काहीही लागणार नाही, आपण मराठी, हिंदू आहोत हे लक्षात ठेवा.जातीपातीमुळे विचका होतो.जाती-पातीमध्ये खितपत पडू नका," असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

पहिल्या भाषणांची आठवण

"आपला वारसा काय आहे ते समजून घ्या, नुसते हार घालून उपयोग नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांना नीट समजून घ्या मी शिवभक्त नव्हे, मी शिववेडा आहे," असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या पहिल्या भाषणांची आठवण यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी शेअर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com