Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडावतील. त्यामुळे या दिवशी संध्याकळची संभा हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची असणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आग्रही होते. यासाठी दोन्ही पक्षांकडून मैदानाची मागणी केली गेली होती. मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली आहे.
खरंतर 17 नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांसाठी या दिवसाला वेगळंच महत्त्व आहे. अशावेळी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादनासाठी मोठी गर्दी होत असते. तर यंदा या दिवशीच शिवतीर्थावर राज गर्जना होणार असल्याने, या सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
प्रचार कालावधी संपणार त्या दिवशीची शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेता यावी यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंकडून जोर लावण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आधी मनसे (MNS)कडून यासाठी परवानगी अर्ज केला गेला होता. त्यामुळे नियमानुसार ही परवानगी देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.
शिवतीर्थावर सभेसाठी परवानगी मिळाल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची ही सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे आता नेमकं काय बोलणार याचीही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सभा आता बीकेसी मैदानावर होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी न मिळल्यास, बीकेसीचा पर्याय म्हणून त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नियोजन केलं होतं, अशीही माहिती आहे. त्यामुळे या दिवशी आता मनसेप्रमुख राज ठाकरे ह पुत्र अमित ठाकरेंसाटी तर उद्धव ठाकरे हे वरूण सरदेसाई यांच्यासाठी प्रचारसभा घेताना दिसतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.