शरद पवार हे नास्तिक; त्यांचा मंदिरातील फोटो कधी बघितला का?

NCP|Sharad Pawar|Raj Thackeray|MNS : जातीतून बाहेर पडणार नसू, तर आपण मराठी कधी होणार? मराठी होणार नसू तर आपण हिंदू कधी होणार?, असे सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले.
Sharad Pawar, Raj Thackeray
Sharad Pawar, Raj ThackeraySarkarnama

मुंबई : शरद पवारांकडे अनेक गुण आहे. मात्र, याच काय करायचं? ते स्वत: नास्तिक असल्याने ते त्यांना अपेक्षित असलेले राजकारण लोकांना सांगतात. शरद पवार (Sharad Pawar) भूमिका मांडताना म्हणतात की, हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. मात्र त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, असे पवार कधीही म्हणतांना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुस्लिमांची मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. तसेच त्यांचा कधी मंदिरातील फोटो बघितला का?, असा सवाल करत राज ठाकरेंची (Raj Thackeray) पवारांवर टीका केली.

Sharad Pawar, Raj Thackeray
राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' दोन मागण्या

राज ठाकरे यांनी आज ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा सडकून टीका केली. याबरोबरच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांवर सुद्धा जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका बदलतो असे मला म्हणावे, आणि त्यात पवारांनी असे म्हणावे, 1999 ला पवारांनी दोन महिन्यात भूमिका बदलली. अशा अनेक भूमिका त्यांनी बदलल्या आहेत. आणि हे मला सांगणार भूमिका बदलल्या बद्दल सांगत आहेत, असे म्हणत राज यांनी पवारांवर टीका केली आहे.

राज म्हणाले, मी कोणती भूमिका बदलली, माझी हिंदुत्वाची भूमिका आधीपासून आहे. 125 वर्षे मराठेशाहीची सत्ता होती, पेशवेशाहीची सत्ता नव्हती, जातीचे राजकारण करू नका. भोंग्याचे राजकारण करण्याची मला गरज नाही. मात्र त्यांचा त्रास झाला तर केसेस अंगावर घ्यायलाही काही हरकत. याआधीही माझ्यावर अनेक केस आहेत. सणासुदीचे दिवस असेल त्यापुरते समजु शकतो मात्र, 365 दिवस हे असले चालणार नाही. आता हनुमान चालिसा सांगतोय यापुढे दुसरे काही करायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी यावेऴी दिला.

Sharad Pawar, Raj Thackeray
ईडीच्या नोटिशीवर राज ठाकरे प्रथमच बोलले...‘या हाताने कधी पापच केले नाही; त्यामुळे...’

जातीपातीच्या राजकारणाच्या चिखलामुळे आपल्या हाती काहीच मिळणार नाही, हे केवळ तुम्हाला उचकावायचे काम करत आहेत. तुम्ही यांच्या मागे फिरू नका, असे राज म्हणाले. पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहास खोटा आणि यांच्या कोकाटेंचा खरा म्हणतात. मात्र, पुरंदरेंमुळेच महाराज घराघरात पोहचले हे खरे आहे. त्यानी लिहलेला इतिहास कधी वाचणार नाही. मात्र, लिहणाऱ्यांची जात सांगितली जाते. हे पेशव्यांनी केले ते यांनी केले, असे जातीयवादी वक्तव्य पवारांनी केले आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी पवारांवर टीका केली.

मराठेशाहीत अठरापगड जातीतले लोक शिव छत्रपतींनी जवळ आणले होते. मात्र, त्यांच्याकडून व संतांकडून घेतलेली शिकवण कुठे गेली? काय करतोय आपण? आज शाळा, कॉलेजमधली मुलं एकमेकांकडे जातीने बघायला लागली. महाराष्ट्राला कुणी हरवू शकलं नव्हतं. मात्र, आता कोण हरवतंय? आमची जात? जातीतून बाहेर पडणार नसू, तर आपण मराठी कधी होणार? मराठी होणार नसू तर आपण हिंदू कधी होणार? शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला हवा. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहे. पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं? अशा शब्दात राज ठाकरेंनी पवारांना लक्ष केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com