ईडीच्या नोटिशीवर राज ठाकरे प्रथमच बोलले...‘या हाताने कधी पापच केले नाही; त्यामुळे...’

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोललो. त्यावेळी त्यांच्या न पटलेल्या भूमिकांवर उघडपणे बोललो.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

ठाणे : मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोललो. त्यावेळी त्यांच्या न पटलेल्या भूमिकांवर उघडपणे बोललो. कोहिनूरमध्ये आयएलएफस नावाची कंपनी होती. त्या कंपनीसंदर्भात मला नोटीस आली होती. पण, मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना (Sharad Pawar) नुसती चाहूल लागली. तर केवढं नाटक केलं? पण, या हाताने कधी पापच केले नाही, त्यामुळे मी ईडीच्या नोटिशींना भीक घालत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईडीच्या नोटिशीवरून ट्रॅक बदलल्याच्या आरोपांना उत्तर दिले. (Raj Thackeray spoke for the first time on the notice of ED)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, व्यासपीठाजवळ येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. मी इतकी काय आग लावणार नाही. मला काही पोलिस भेटायला आले, त्यांनी विचारलं तुम्ही कधी निघणार आहात. त्यावेळी त्यांनी सांगितले की तुमचा ताफा काही संघटना अडवणार आहेत. माझा ताफा अडवणार आहे, हे इंटिलेजन्सला कळलं. पण पवारसाहेबांच्या घरावर एसटीचे कर्मचारी जाणार, हे त्यांना कळलं नाही. पण त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात. अगदी एखादी व्यक्ती शिंकली तरी त्यांना कोरोनाचा आहे की इतर आहे, हे माहिती होते.

Raj Thackeray
गणेश नाईक अडचणीत : पीडितेच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले. पण त्यानंतरही मतदारांची प्रतारणा केली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आले. त्या अगोदर पहाटेचा शपथविधी झाला. तो फिस्कटला आणि त्यानंतर यांचे सरकार बसले. या दोन्ही गोष्टींवर बोलल्यानंतर यात भाजपची स्क्रीप्ट कुठे आले. हे सर्व विसरले होते, त्याची फक्त आठवण करून दिली, असे राज यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray
आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची माझी इच्छा : जयंत पाटलांनी केले कौतुक

नरेंद्र मोदीवर बोलत होतो, त्यावेळी त्यांच्या न पटलेल्या भूमिकांवर उघडपणे बोललो. पण, ईडीची नोटीस आल्यामुळे मी हा ट्रॅक बदलला असे सांगितले जाते. मी नाही ट्रॅक बदलला, मला ट्रॅक बदलण्याची गरज नाही. कोहिनूरमध्ये आयएलएफस नावाची कंपनी होती. त्या कंपनीसंदर्भात मला ती नोटीस आली होती. पण, ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना नुसती चाहूल लागली. केवढं नाटक केलं त्याच्यावर? या हाताने पाप केलेच नाही... त्यामुळे भीक नाही घालत त्याला. बरं आम्ही व्यवसायही करायचा नाही का? बरं मी तेव्हा बोललो, मला मोदींच्या भूमिका मला नव्हत्या पटल्या. पण, त्याच मोदींची चांगली धोरण मला पटली. त्याच नरेंद्र मोदी सरकारने 370 कलम रद्द केले. त्यावर पहिले ट्वीट मी केले. मोदी हे पंतप्रधान व्हावेत, अशी मागणी करणारा मी पहिला होता.

Raj Thackeray
जयंत पाटलांची ‘एबी फाॅर्म’ घेऊन जायची ऑफर..!

जम्मूत सभा पाहिली जात आहे

राजकीय पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज ठाण्यात सभा घेतली. काही पत्रकार हे या पक्षाला बांधील आहे, त्यामुळे माझा विषय भरकवटू द्यायचा नव्हता. त्यामुळे मी ही ठाण्यात सभा घेतली. लोडशेडिंगमुळे आपल्या राज्याच्या काही भागात ही सभा दिसत नाही. पण ही सभा मोठ मोठे स्क्रीन लावून जम्मूत पाहिली जात आहे. अनेक राज्यात ती पाहिली जात आहे. काही पत्रकारांमुळे चांगले पत्रकार एकटे पडले आहेत. त्यातील काहीजण पक्षाकडे गेले आहेत, त्यामधून काही जण संपादक झाले आहेत. लगान चित्रपट पाहण्यापूर्वी मी आशुतोष गोवारीकरांना मी बरं वाईट बोलले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर मी गोवारीकरांची माफी मागून चित्रपट चांगला झाल्याचे सांगितले हेाते. तसे काही लोकांचे झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com