MNS: मनसे-भाजपमध्ये आतषबाजी सुरू; शेलार-देशपांडेंमध्ये जुंपली...मराठी पंतप्रधान करून दाखवा!

Sandeep Deshpande : मनसेनं भाजपला थेट मराठी माणसाला पंतप्रधान करण्याचं आव्हान दिलं आहे.
sandeep deshpande, ashish shelar
sandeep deshpande, ashish shelarSarkarnama

Mumbai : दीपोत्सव कार्यक्रमावरून भाजप अन् मनसेमध्ये 'फटाके फुटण्यास' सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध सलमी-जावेद या जोडीबरोबर अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यांसारख्या बड्या सेलिब्रेटींनी सहभाग घेतला होता. यावर भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. त्याला मनसेनं सडेतोड उत्तर दिले आहे.

sandeep deshpande, ashish shelar
Karjat Jamkhed News: आमदारांमुळे कर्जत-जामखेडमध्ये मतदारांना डबल धमाका

एका कार्याक्रमात “काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. आदरपूर्वक नाव घ्यायचं झालं, तर सलीम खान-जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यांनी त्यांची टिमकी वाजवून घेतली. ते मोठे असतील, आहेत; पण आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपची कल्पना आहे,” असं आशिष शेलार म्हणाले. सोहळ्यावरून मनसेच्या मराठी प्रेमाबद्दल भाजपने सवाल उपस्थित केला आहे. भाजपने केलेल्या या टीकेवरून मनसेनं भाजपला थेट मराठी माणसाला पंतप्रधान करण्याचं आव्हान दिलं आहे.

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आता भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. “मराठी कलाकारांवर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभे राहतं? व कोण पळतं हे महाराष्ट्राला माहीत आहे,” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“त्यांचं मराठी प्रेम म्हणजे पुतना मावशीचं. मराठीबद्दल एवढं प्रेम असेल, तर गुजराती पंतप्रधानांऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. एवढं बोलायचीदेखील हिंमत दाखवतील का?” असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

sandeep deshpande, ashish shelar
Mumbra News: ठाकरेंचे बॅनर फाडले; आव्हाडांकडून Video शेअर; दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने येणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com