Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray : मनसेचं सगळंच ठरलं! उमेदवार, चिन्ह, अन् पक्ष; काय सांगतो व्हायरल पोस्टर...

Maharashtra MNS : युती करायची की नाही, कुणाबरोबर जायचे की नाही हे सगळे नंतर ठरवू, मात्र मनसेची सत्ता आली पाहिजे, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
Published on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभेत मात्र स्वतंत्र चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे. महायुतीत जागावाटपावरून होणारी हाणामारी पाहता मनसेने एकला चलोचा नारा दिल्याचे बोलले जात आहे.

आता मनसे विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार आहेत. त्यादृष्टीने राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनेसने पाऊल टाकले आहे. आगामी विधानसभा मनसे राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे Raj Thackeray यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यानंतर मनसेने एक पोस्टर व्हायरल केले आहे. त्यात आमचा पक्ष राज ठाकरे, आमचे चिन्ह राज ठाकरे, आमचा उमेदवार देखील राज ठाकरे..असे स्पष्ट केले आहे.

तसेच चला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून राजसाहेबांना निवडून आणायची, असे आवाहनही राज्यातील जनतेला करण्यात आले आहे. या पोस्टरवर सर्वात वर राज ठाकरे आणि महाराष्ट्राचा फोटो असून शेवटी मनसेचा उमेदवार राज ठाकरे! असे स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray
Shishupal Patle : भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये जाणार? ; बावनकुळेंना पाठवला राजीनामा!

या पोस्टरवरून मनसे MNS विधानसभा निवडणूक राज ठाकरेंचा चेहरा पुढे करून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंच्या नावाने मते मागण्याचा पक्षाची निवडणुकीतील रणनीती असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. मनसेच्या या रणनीतीला राज्यातील जनता कसा प्रतिसाद देते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत Mumbai पदाधिकारी मेळावा घेत, विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. युती करायची की नाही, कुणाबरोबर जायचे की नाही हे सगळे नंतर ठरवू, मात्र मनसेची सत्ता आली पाहिजे यासाठी आपण 225 ते 250 जागा लढवायच्या असल्याचे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी त्यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच तिकीट मिळेल. तिकीटानंतर मी पैसे काढायला मोकळा, अशी वृत्ती असणाऱ्याला तिकीट दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray
Nilesh Lanke : 15 दिवसात 'LCB'चे कारनामे बाहेर येणार; लंकेच्या आंदोलनावर रश्मी शुक्लांचे चौकशीचा आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com