Shishupal Patle : भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये जाणार? ; बावनकुळेंना पाठवला राजीनामा!

BJP Vs Congress News : पटले सोडून गेल्याने भाजपला आपल्या हक्काचा मतदारही गमावावा लागणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. विधानसभा निवडणूक तोंडवर असताना पटले भाजपला सोडून गेले आहे.
Shishupal Patle
Shishupal PatleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara-Gondia District Politics : अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार सुनील मुंढे यांचा पराभव झाल्यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपला घरघर लागली आहे. माजी खासदार तसेच पोवार समाजाचे नेते शिशुपाल पटले यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. एका पाठोपाठ एक जुने नेते सोडून जात असल्याने पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले(Nana Patole), माजी खासदार खुशाल बोपचे, माजी मंत्री महादेवराव शिवणकर, माजी आमदार चरण वाघमारे हे जिल्ह्यातील बडे नेते यापूर्वीच पक्षातून बाहेर पडले आहेत. यात आता पटले यांची भर पडली आहे.

शिशुपाल पटले यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. पक्ष शेतकरी आणि बेरोजगारांकडे लक्ष देत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. असे असले तरी भविष्यात ते कुठल्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shishupal Patle
Nana Patole Vs Devendra Fadnavis आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात नाना पटोलेंची उडी; फडणवीसांना फटकारले, म्हणाले...

शिशुपाल पटले(Shishupal Patle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांना पराभवाचा धक्का दिला होता. पटेल, पटोले आणि पटले अशी राजकीय लढत यापूर्वी येथे होत होती. पटले जिल्हा परिषदेचेसुद्धा अध्यक्ष होते. युवा नेत्यांचे आगमन व त्यांच्या कराभारामुळे भाजपासून अनेक कार्यकर्ते दुरावत चालल्याचे दिसत आहे . एकेकाळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क घट्ट होते. पोवार समाजही भाजपसोबत होता. या लोकसभा मतदारसंघातील भाजपची पकड आता सैल होत चालली असल्याचे दिसून येते.

लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुनील मेंढे यांना काँग्रेसच्या(Congress) नवख्या उमेदवारवाराने पराभूत केले. महायुती आणि प्रफुल पटेल सोबत असतानाही पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात आहे. तो भाजपसोबत असल्याचे दिसते. पटले सोडून गेल्याने भाजपला आपल्या हक्काचा मतदारही गमावावा लागणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

विधानसभा निवडणूक तोंडवर असताना पटले भाजपला सोडून गेले आहे. ते अनेक वर्षांपासून पक्षात अस्वस्थ होते. पक्षात कोणी विचारत नाही, निर्णय घेत नाही, समाजाकडे लक्ष देत नाही अशा तक्रारी त्यांच्या होत्या.

Shishupal Patle
Shyam Manav : चंद्रशेखर बावनकुळेंना श्याम मानव यांचे प्रत्युत्तर, 'राजकीय संस्कृती...'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौरा जाहीर केला होता. या दरम्यानच पटले यांनी राजीनामा दिला. याच कारणावरून बावनकुळे यांनी आपला दौरा रद्द केला असल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com