MNS demand to demolish Aurangzeb tomb:
मुंबई : गेल्या आठवड्यात एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यामुळे सत्ताधारी शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्वच पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता मनसेने औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेनेकडून करण्यात आली आहे. ''18 डिसेंबर 2000 रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात की, “संभाजीनगर यइथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे आणि ते पुन्हा बांधता कामा नये. शिवसेनेचं हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का आणि हे थडगं जमीनदोस्त होणार आहे का?” असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे.
या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय, ही निजामाची औलाद इथे येऊन या थडग्यावर नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का असाही सवाल गजानन काळे यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी शिवसेनेने अनेक गोष्टींवरुन शिवसेनेने पलटी मारल्याचा टोलाही लगावला आहे. “आपण संभाजीनगरच्या नामकरणावरुन पलटी मारली, बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांच्या भूमिकेवरुन पलटी मारली. आता तरी बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार, या शिवरायांच्या महाराष्ट्रातलं हे थडगं आपण तोडून टाकणार आहात का?, हा आमचा सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा असं आम्ही आव्हान करतो,” असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर खासदार जलील यांनी स्पष्टीकरणही द्यावे लागले, खरं तर खुलताबादमध्ये अनेक दर्गा असल्याने एकाचे दर्शन घेतले आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले असे करता येत नाही. त्यामुळे याचे वेगळे अर्थ काढू नयेत. असे जलील यांनी सांगितलं. औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होताना जलील यांनी भगवा रुमाल डोक्यावर घालण्याबाबत ते म्हणाले की, भगवा, हिरवा, निळा सर्व रंग माझे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.