मनसेचा ठाण्यातील दुसरा नेताही सेनेच्या वाटेवर... उदय सामंतांची घेतली गुप्त भेट

महापालिका निवडणुकांआधी मनसेला सध्या मोठे धक्के बसत आहेत.
Uday Samant

Uday Samant

Sarkarnama 

Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) सध्या वारंवार धक्के बसत आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्षाच्या नवनिर्माणासाठी राज्यभर दौरे करत असतानाच त्यांचे काही निष्ठावंत सैनिक सध्या इतर पक्षांचे दरवाजे ठोठावताना दिसत आहेत.

पुण्यात मनसेच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर आजच पक्षाचे नेते, चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई हे पण उपस्थित होते. या भेटीबद्दस खुद्द पानसे यांनी काही सांगितले नाही. पण सामंत यांच्या म्हणण्यानुसार ते वेगळ्या कामासाठी भेटले होते. अभिजित यांचे वडिल रमेश पानसे हे शिक्षणक्षेत्रात काम करतात. त्यासंबंधी अभिजित भेटायला आल्याचा दावा सामंत यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Uday Samant</p></div>
राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

सामंत(Uday Samant) यांच्या या दाव्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. पानसे यांचे ठाणे व मुंबई परिसरात काम आहे. मनसेकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते आता कोणत्या मनसे नेत्यांवर आरोप करत पक्ष सोडतात, याची उत्सुकता आहे. राज यांच्या जवळचे समजले आदित्य शिरोडकर, रुपाली पाटील यांनी आधीच पक्ष सोडला आहे. त्यात आता पानसे यांची भर पडणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

<div class="paragraphs"><p>Uday Samant</p></div>
रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं; रुपाली ठोंबरे - पाटील; पाहा व्हिडिओ

दुसरीकडे रुपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. रूपाली यांना छोट्या बहिणीप्रमाणे पक्षात मान देवू, अशी ग्वाही अजित पवार यांनी या वेळी दिली. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पडू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या वेळी उपस्थित होते. राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर असताना पाटील यांनी मनसेचा त्याग करणे, हे पक्षातील काही नेत्यांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com