...,म्हणूनच पवार साहेबांचं राज ठाकरेंवर अन् मनसेवर बारकाईने लक्ष

MNS|Raj Thackeray|Sharad Pawar : बाळासाहेबांच्या तालमीतच राज ठाकरे तयार झालेले आहेत, त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण त्यांच्यामध्ये आले आहेत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहे.
bala nandgaonkar
bala nandgaonkarsarkarnama

मुंबई : पक्ष संपलाय, लक्ष देणार नाही असे म्हणणारे मनसेवर (MNS) टीका करत आहेत. मात्र इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि पवार साहेबांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहेत, पवार साहेब असे कुणालाही प्रतिक्रिया देत नाहीत, गुढीपाडव्याच्या सभेनंतर पवार साहेबांनी (Sharad Pawar) तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली, त्यानंतर ठाण्याच्या उत्तर सभेनंतर देखील त्यांनी तातडीने उत्तर दिलं याचा अर्थ पवार साहेबांच राज ठाकरेंवर (Raj Thackeray) आणि मनसेवर बारकाईने लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली आहे. ते डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्या सोबत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

bala nandgaonkar
'हिंदुजननायक' राज ठाकरे : मनसैनिकांनी पुण्यातील कार्यक्रमाआधी दिली नवी उपाधी!

नांदगावकर म्हणाले, इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि पवार साहेबांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहे. पवार साहेब असे कुणालाही प्रतिक्रिया देत नाही, गुढीपाडव्याच्या सभेनंतर पवार साहेबांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेनंतर देखील त्यांनी तातडीने उत्तर दिलं याचा अर्थ पवार साहेबांचं राज ठाकरेंवर आणि मनसेवर बारकाईने लक्ष आहे. मनसेचे इंजिन फास्ट निघाले असे दिसते त्यामुळे ते दखल घेतात याचा मला आनंद आहे, असा टोला देखील नांदगावकरांनी लगावला आहे.

bala nandgaonkar
माझा राग अमित ठाकरेंवर नव्हता; पण,...

दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेमध्ये मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी तीन मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अल्टीमेटम फक्त बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात, अशी टीका केली होती. यावर बोलताना नांदगावकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या तालमीतच राज ठाकरेही तयार झालेले आहेत, त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण त्यांच्यामध्ये आले आहेत. अल्टीमेटम हा उपजत गुण आहे तो राज यांच्यात आला आहे, असे प्रत्युत्तरही राऊतांच्या टीकेला नांदगावकरांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com