'हिंदुजननायक' राज ठाकरे : मनसैनिकांनी पुण्यातील कार्यक्रमाआधी दिली नवी उपाधी!

हिंदुहृदयसम्राटवरील वादानंतर मनसैनिकांची राज ठाकरेंना नवी उपाधी
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

पुणे : राज्यातील मशिदींवरील भोंग्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन उठलेलं वादळ अद्याप शांत झालेले नाही. अशातच आता स्वतः राज ठाकरे भोंग्याविरोधातील आंदोलनात उतरणार आहेत. उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी (१६ एप्रिल) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक पठण देखील होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडूनही जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने मनसेकडून काही पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत. यात मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांना आता 'हिंदुजननायक' राज ठाकरे अशी नवी उपाधी देण्यात आली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा अधिक होत आहे.

Raj Thackeray
भोंग्यावरुन मनसेत खिंडार ; ३५ जणांची सोडचिट्टी, राजीनामा सत्र सुरुच

मागच्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 'हिंदूह्रदयसम्राट' असा उल्लेख असणारे बॅनर्स मुंबईतील (Mumbai) घाटकोपर भागात झळकले होते. त्यावेळी राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र राज ठाकरे यांनी त्याचवेळी मनसैनिकांना 'हिंदुहृदयसम्राट' केवळ एकच आहेत. पुन्हा असे प्रकार करू नका असे बजावले होते. मनसेनेकडून पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारची बॅनरबाजी न करण्याचे आदेश दिले होते.

Raj Thackeray
इतिहासातून समाज घडविण्याऐवजी उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचे उद्योग !

पण आता पुण्यातील महाआरतीच्या कार्यक्रमाआधी राज ठाकरे यांचा उल्लेख मनसैनिकांनाकडून 'हिंदुजननायक' असा करण्यात येत आहे. २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्याचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com