MNS Leader Meet Devendra Fadnavis : मनसे नेत्यांची सदिच्छा भेट... की युतीत सामील होण्याचा निर्णय?

MNS Leaders Meet Maha DY CM Devendra Fadnavis: मनसेला आगामी निवडणुकांसाठी महायुतीमध्ये सामील करून घेण्यासाठी तिन्ही पक्ष तयार आहेत का, हादेखील एक प्रश्न आहे.
Devendra Fadnavis | Raj Thackeray
Devendra Fadnavis | Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Elections 2024: मनसे नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीत मनसेला अढळ स्थान मिळणार का? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. (MNS Leader Meet Devendra Fadnavis)

मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास त्यांची भेट झाली. मात्र, ही भेट सदिच्छा भेट होती, असं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी चर्चादेखील झाली असल्याची शक्यता आहे. मनसेला आगामी निवडणुकांसाठी महायुतीमध्ये सामील करून घेण्यासाठी तिन्ही पक्ष तयार आहेत का हादेखील एक प्रश्न आहे. (Bala Nandgaonkar)

राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांची वाढती जवळीक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांची जवळीक वाढलेली दिसत आहे. राज ठाकरे यांनी काही विषयांवरून जरी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली असली, तरी त्याचं निरसन ताबडतोब राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. राज्य सरकारमधील मंत्री आणि खासदार हे राज ठाकरे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतात.

स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. या सगळ्या घटनांवरून एकंदरीत अंदाज बांधला जात आहे, की आगामी निवडणुकांसाठी मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासाठी तिन्ही पक्षांची तयारी असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis | Raj Thackeray
Kalyan Dombivli : आयुक्त दालनाबाहेर राडा! पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकांनी केली मारहाण

दक्षिण मुंबईसाठी मनसे आग्रही?

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेसाठी आता मनसे आग्रही आहेत का?

असा प्रश्न उपस्थित होतो. काल जी आढावा बैठक राज ठाकरे यांनी घेतली, त्या बैठकीत दक्षिण मुंबई या जागेसाठी तयारीला लागा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, असा कानमंत्र दिला आहे. त्यामुळे या जागेसाठी मनसेने पूर्ण तयारी केलेली दिसत आहे.

दक्षिण मुंबई (Mumbai) ही एक महत्त्वाची जागा आहे. या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपदेखील आग्रही आहे. मात्र, भाजपचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. जर मनसे महायुतीत सामील झाले तर मात्र या जागेसाठी लढत अधिक वाढेल आणि जर भाजपने मनसेसाठी ही जागा सोडली तर मात्र मनसेचा उमेदवार निवडून देण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील.

Devendra Fadnavis | Raj Thackeray
Raj Thackeray On NCP: 'बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण...' राज ठाकरेंनी अजित पवारांना सुनावलं

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com