Mumbai South-Central Voting LIVE: 'चोरलेल्या धनुष्यबाणाचे ते चुंबन घेताहेत...'; राज यांच्या मतदानावर राऊतांची टोलेबाजी

Mumbai South-Central Lok Sabha Election 2024 voting News: "महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे हे यंदा तब्बल 18 वर्षांनी धनुष्यबाणाला मतदान करतील," असे शेवाळे यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते.
Mumbai South-Central Voting LIVE news
Mumbai South-Central Voting LIVE news Sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे हे राहत असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात (Mumbai South-Central Voting LIVE) शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. आज राज ठाकरेंना (Raj Thackeray) आपला मतदानाचा हक्क बजावला. ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरेंच्या मतदानांची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. हा धनुष्यबाण चोरलेला आहे. ते चोरीच्या मालावर ते हक्क सांगत आहेत. चोरीच्या मालाचे ते चुंबन घेत आहेत. ते नकली व्होट आहे. त्यांना ती सवय आहे, असे सांगत राऊतांनी राज यांना टोला लगावला.

"महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे हे यंदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत, तब्बल 18 वर्षांनी ते धनुष्यबाणाला मतदान करतील," असे शेवाळे यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते.

Mumbai South-Central Voting LIVE news
Thackeray group News: राऊत अन् पोलिसांमध्ये बाचाबाची; भांडुप येथील मतदान केंद्राजवळ ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात

"ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्ष मतदान केले, त्या कमळाबाईने देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे.उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला मतदान करणार आहेत. परंतु हा पंजा काँग्रेसचा आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन कार्य केले आहे," असे राऊतांनी सांगितले.

राऊत म्हणाले, "आम्ही देश आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत आलो आहोत. उद्धव ठाकरे पंज्याला मतदान करत आहेत, तसे काँग्रेसचे अनेक नेते मशाल आणि तुतारीला मतदान करीत आहेत,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

" राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर त्यांना चांगले दिवस आले असते. कार्यकर्त्यांना आनंद झाला असता. एकेकाळी राज ठाकरे हे मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, असे म्हणत होते. परंतु आता ते चोरीच्या मालाचे समर्थन करीत आहेत. भाजपसाठी फिरत आहे. सभा घेत आहेत, असे राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांच्यासह अनेकांना भाजपने भाड्याने घेतले आहे. राज ठाकरे ज्या मोदी आणि शाह यांचे कौतूक करत आहेत, त्यांनी काय महान दिवे लावले आहेत, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com