Sandeep Deshpande Vs Aditya Thackeray : 'तू काय डोनाल्ड ट्रम्प आहेस का? तुझ्या विरुद्ध..' ; संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार!

MNS leader Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघामधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
Sandeep Deshpande Vs Aditya Thackeray
Sandeep Deshpande Vs Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Political News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवाय, विरोधी पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका टिप्पणीही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. शिवाय, मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही टोला लगावला होता. ज्यावर आता संदीप देशपांडेंकडून पलटवार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघामधून संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यावरून अनेक चर्चाही सुरू आहेत.

शिवाय, आदित्य ठाकरेंसमोर आता आव्हान असणार आहे, असंही मनसैनिकांकडून बोललं जात आहे. या सगळ्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी मनसेला टोला लगावत, 'माझ्या विरोधात मला वाटलं बायडेनच लढत आहेत.' असं म्हटलं होतं.

Sandeep Deshpande Vs Aditya Thackeray
Aditya Thackeray News : 'पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला अन् त्यानंतर आता...' ; 'MNS'ला आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचलं?

ज्यावर आता संदीप देशपांडे यांनी 'तू काय डोनाल्ड ट्रम्प आहेस का? तुझ्या विरुद्ध जो बायडेन उभा राहील ? आम्हाला महत्व देत नाही ठीक आहे पण ज्या वरळीतील जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्यांनाही तुम्ही गेल्या पाच वर्षात महत्व दिले नाहीत. आम्हाला माहितेय तुमच्या साठी महत्वाचे विषय हे पेंग्विन आणि नाईट लाईफ आहेत.' असं म्हणत आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.

Sandeep Deshpande Vs Aditya Thackeray
Raj Thackeray Solapur PC : राज ठाकरे पुतण्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार; मनसेचा वरळीचा उमेदवारही निश्चित!

आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) पत्रकार परिषदेत मनसेवर बोलताना म्हणाले, 'पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू. कोरोना काळ असेल किंवा मुंबईत चांगलं, वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का?' अशी टीकाही केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com