Raju Patil: जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं असतं, तर ही वेळ आली नसती!

Maratha Reservation: आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, याचं भान ठेवा...
Raju Patil News
Raju Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटीतून मराठा समाज पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठीचा मार्ग मनोज जरांगेंनी जाहीर केला आहे. या उपोषणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आमदार राजू पाटील यांनी जरांगेंना सल्ला दिला आहे.

"राज्य सरकारने त्याचवेळी जरांगेंना स्पष्ट सांगायला पाहिजे होते. त्यांना तेव्हा समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे ही वेळ आली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मुंबईत त्यांचं स्वागतच आहे. मात्र आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याच भान ठेवून सर्वांनी आंदोलन करावं. आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे," असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

Raju Patil News
Nana Patole News: गांधी कुटुंबाला मोदी सरकार घाबरते; पटोलेंची उडवली खिल्ली

"मराठा आरक्षणाचा विषय इतका सोपा नाही. पहिले सरकार बरं बरं बोलत होते आता खर खंर बोलत आहे, हे मी अगोदरच स्पष्ट केलं आहे. कारण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल. जनगणना आवश्यक आहे, या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारने जेव्हा जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतली तेव्हाच स्पष्ट करायला पाहिजे होते की या गोष्टी साठी थोडा वेळ जाणार आहे आणि हे सत्य आहे. सरकारने स्पष्ट बोलायला सुरुवात केली पाहिजे," असे राजू पाटील म्हणाले.

कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येबाबत राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केल्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांचं कौतुक केलं. जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांना सांगितले होते की दोन्ही शहरं तुम्ही समजून घ्या, त्यानंतर आम्ही काही मागण्या घेऊन तुमच्याकडे येतो. तूर्तास इच्छाशक्ती असेल तर हा स्टेशन परिसर सुधारला जाऊ शकतो. डीपी रोड मध्ये आलेले अनधिकृत कामे हटवून लोकांना चांगला दिलासा दिला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने प्रशासनाने कामे सुरू केली आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन,असे राजू पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"या गोष्टी एका झटक्यात होऊ शकत नाहीत ,कारण ज्या वाईट सवयी आहेत त्या येथील राज्यकर्त्यांनी लावून ठेवल्या आहेत. डोंबिवली पूर्वेला राजकीय पक्षाचे पदाधिकारी हप्ते घेऊन फेरीवाल्यांना बसवतात हे जगजाहीर आहे. म्हणूनच फेरीवाल्यांच्या विषयावर फक्त मनसेच बोलताना दिसते. बाकी कोणी पक्ष बोलत नाही. पण सध्या चांगली सुरवात सध्याच्या आयुक्तांनी केली आहे. आमचा त्यांना पाठींबा आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

मुंबई होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी रात्री उशिरा मराठा सेवकांचे शिष्ट मंडळ मुबंईच्या दिशेने रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात मराठवाड्यातील मराठा सेवकांचा समावेश असून हे शिस्त मंडळ 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. पाहणी झाल्यानतर आझाद मैदानावर हे शिष्ट मंडळ आंदोलनाच्या तयारीचा बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. अंतरवाली सरांटी गावांत मनोज जरागे पाटील यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

Raju Patil News
BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com