Kalyan Dombivli Politics News : दुजाभाव करू नका !; मनसे आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंकडे अशी कोणती मागणी केली?

Mns Mla Raju Patil To CM Eknath Shinde : मनसे आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
CM Eknath Shinde, Raju Patil
CM Eknath Shinde, Raju PatilSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Politics News : मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केली. कोणताही दुजाभाव न करता मागणी मान्य कराल, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवली जिमखान्याला स्टेडियमसाठी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली. त्यानंतर जिमखान्याचे सदस्य म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले. त्यासोबतच आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे एक मागणीही केली आहे.

CM Eknath Shinde, Raju Patil
Thackeray Group News : चुकलं असेल तर, माफ करा; ठाकरेंच्या खासदारावर भर सभेत विनंती करण्याची वेळ?

कोणताही दुजाभाव न करता आपण माझी ही मागणी मान्य कराल अशी अपेक्षा आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आरक्षित भूखंड तसेच गुरचरण जागा अजूनही शिल्लक आहेत. अशा भूखंडांवर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशस्त स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

डोंबिवली जिमखान्याने कोविड काळात कोणतेही भाडे न आकारता कोविड सेंटरसाठी मोफत जागा दिली होती. परंतु कोविड संपल्यानंतर अनेक विनवण्या करूनही महापालिकेने कृतघ्नता दाखवत जागा रिकामी करून दिली नाही. त्याचा प्रचंड मनस्ताप जिमखाना सदस्यांना व खेळाडूंना झाला होता. त्यातूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा करून एकप्रकारे या जखमेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे. त्याबद्दलही आभारी असल्याचे राजू पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामीण भागात कित्येक मुले-मुली क्रिकेट, कब्बड्डी, कुस्ती, शूटिंग, फूटबॉल अशा विविध खेळात आपले नैपुण्य दाखवत आहेत. एकीकडे सरकारने आमच्या हक्काच्या गुरचरण जमिनी मेट्रो कारशेड, डम्पिंग, ग्राउंड, ग्रोथ सेंटर, म्हाडा व इतर बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. मात्र उरलेल्या जागांवर विचार करून त्या जमिनी वाचवा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

Edited by Sachin Fulpagare

CM Eknath Shinde, Raju Patil
Thackeray vs Bjp : भाजप मंत्र्याचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; उद्घाटनाच्या श्रेयावरून उडाला धुरळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com