One Nation, One Election : 'एक देश एक निवडणूक' बाबत मनसेकडून भूमिका स्पष्ट ; आमदार राजू पाटील म्हणाले...

MNS MLA Raju Patil : . सततच्या निवडणुकांशिवाय आपल्याकडे दुसरा उद्योग नाही का, असा प्रश्न पडतो,"
One Nation, One Election
One Nation, One ElectionSarkarnama

Mumbai News : 'एक देश एक निवडणूक' हे विधेयक मोदी सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. एक देश एक निवडणुकीला (One Nation, One Election) अनेक पक्षांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी 'एक देश एक निवडणूक'बाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,आपल्याकडे सतत निवडणुका असतात, हे चुकीचे आहे. सततच्या निवडणुकांशिवाय आपल्याकडे दुसरा उद्योग नाही का, असा प्रश्न पडतो,"

One Nation, One Election
Jalna Maratha Protest : अजितदादा, "हिंमत असेल तर कारवाई करुन दाखवा " ; पटोलेंचे आव्हान

"एक देश एक निवडणूक" एका अर्थाने चांगले आहे. पण या निवडणुका प्रामाणिक, पारदर्शक होणे गरजेचे आहे," असे राजू पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राजू पाटलांनी निषेध केला. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

One Nation, One Election
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंनी सांगितला शिवसेनाप्रमुखांचा 'तो' किस्सा ; बाळासाहेब माझ्यावर चिडले...

"यापूर्वी अनेक वेळा मराठा आंदोलन झाले, ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाले. अचानक काय घडलं की पोलिसांना तेथे लाठीचार्ज करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा समाजाचे आहेत. त्यांनी स्वतः या प्रश्नात जातीने लक्ष देऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल, मराठा आरक्षणाचा विषय कसा मार्गी लावता येईल, यात लक्ष द्यायला पाहिजे," असे राजू पाटील म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com