Mla Raju Patil News: जवळ आले नाही तर मारील...; मनसे आमदार राजू पाटील अधिकाऱ्यांवर भडकले

Raju Patil got angry over the issue of water: मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
Mla Raju Patil News
Mla Raju Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून 'केडीएमसी'च्या 27 गावांत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या माध्यमातून पाण्याच्या टाकी उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, ही कामे योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर राजू पाटील यांनी मंगळवारी कामाची पाहणी करत काही त्रुटी आढळून आल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

या पाहणी दरम्यान, आमदार पाटील यांनी काम योग्य पद्धतीने सुरू आहे का?, असं अधिकाऱ्यांना विचारलं. यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना जवळ बोलावताच ते न आल्याने आमदारांनी "काही करत नाही इकडे या पहा आणि मला सांगा" असं म्हणत अधिकाऱ्यांना बोलवलं.

यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. त्यानंतर "इकडे नाही आलात तर मारील", असं म्हणताच अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तपासणी करण्यात येईल, असं आमदार पाटील यांना सांगितलं.

Mla Raju Patil News
Shinde Vs Pawar: जामखेड बाजार समितीत दैव राम शिंदेंच्या बाजूने; ईश्‍वर चिठ्ठीतून सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा

कल्याण ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून काम करण्यात येत आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येत आहे. पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम गावागावांत सुरू आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही कामे सुरू असून काम लवकर होण्यासाठी आमदार पाटील हे पाठपुरावा करत आहेत.

पण काटई, भोपर येथे सुरू असलेले टाकी उभारण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आमदार राजू पाटील यांच्याकडे आली होती. तसेच भोपर येथे टाकीचे काम सुरू असताना टाकीचा काही भाग कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यानंतर आमदार पाटील यांनी आज काटई गावात जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांना कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. यावेळी अमृत जल योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांसह इतर साईड अभियंता श्रीकृष्ण उपस्थित होते.

Mla Raju Patil News
Nitin Gadkari Threat News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट

यावेळी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम योग्य पद्धतीने सुरू आहे का?, असं विचारलं. मात्र, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता येत नसल्याने आमदार भडकले. हे कशा पद्धतीने काम सुरू आहे.

अशा पद्धतीने आमच्याकडे चाळ पण बांधत नाही, तुम्ही तरी पाण्याच्या टाक्या बांधतायत?, असे खडे बोल आमदार पाटील यांनी सुनावले. यानंतर कामाच्या गुणवत्तेविषयी जबाबदार अधिकाऱ्याची लेखी तक्रार करून कारवाई करण्याची सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com